आयपीएल 2022 साठी रेटेन्शन झालेल्या खेळाडुंची यादी आज जाहीर करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याचे नियम काय असणार आहेत, आणि खेळाडुंना किती पैसे मिळणार? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. यंदा आयपीएलमध्ये जवळपास 10 टीम खेळणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा आणखी रंगतदार होणार आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नव्या टीम
यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नव्या टीम उतरणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबादच्या टीममुळे बीसीसीआयला जवळपास 12 हजार कोटींचा फायदा झाले आहे. या दोन नव्या टीम आयपीएलमध्ये उतरल्यानं आयपीएलची सर्व गणितं बदलणार आहेत.
खेळाडुंची रेटेंन्शन प्रक्रिया आज संपणार
खेळाडुंच्या रिटेन प्रक्रियेसाठी बीसीसीआयकडून 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. कोणती टीम कोणते खेळाडू रिटेन करते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून एमएस धोनी आणि सुरेश रैना यांची नावं जवळपास निश्चित झाली आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
कोणत्या खेळाडुला किती पैसे मिळणार?
जगातील इतर क्रिकेट लीगपैकी सर्वात जास्त पैसा भारतातील आयपीएलमध्ये लागतो. सध्याच्या टीमना प्रत्येकी 4 खेळाडू रिटेन करता येणार आहेत. त्यात 2 पेक्षा जास्त विदेशी खेळाडू नसावेत अशी अट ठेवण्यात आली आहे. अहमदाबाद आणि लखनऊच्या टीमला खेळाडुंच्या निवडीसाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. प्रत्येक टीमला 90 कोटींचं बजेट देण्यात आलं आहे. पहिल्या खेळाडुला 16 कोटी, दुसऱ्या खेळाडुला 12 कोटी तिसऱ्या खेळाडुला 8 कोटी आणि चौथ्या खेळाडुला 6 कोटी रुपये मिळणार आहेत. जर एखाद्या टीमने 3 खेळाडू रिटेन केले तर, पहिल्या खेळाडुला 15 कोटी, दुसऱ्या खेळाडूला 11 कोटी आणि तिसऱ्या खेळाडुला 7 कोटी रक्कम मिळणार आहे.