Chennai Super Kings Players List For IPL 2024 | फक्त ‘या’ ऑलराऊंडरसाठी धोनी सर्व पैसा खर्च करणार का?

Chennai Super Kings Players List For IPL 2024 | आयपीएल 2024 मध्ये ट्रॉफी जिंकून धोनीला निरोप देण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल. सीएसकेने पाचवेळा आयपीएलच जेतेपद पटकावलय. काही स्टार ऑलराऊंडर्सना ताफ्यात घेण्याचा CSK चा प्रयत्न असेल.

Chennai Super Kings Players List For IPL 2024 | फक्त 'या' ऑलराऊंडरसाठी धोनी सर्व पैसा खर्च करणार का?
CSK IPL Auction 2024
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 11:03 AM

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग 2024 खूप खास असेल. कारण टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच हे शेवटच आयपीएल ठरु शकत. एमएस धोनीने आधीच या बद्दल संकेत दिले आहेत. कदाचित तो शेवटचा आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. चॅम्पियन बनवून कॅप्टनला निरोप देण्याचा CSK चा प्रयत्न असेल. आयपीएल 2024 च्या ऑक्शनमध्ये चॅम्पियन टीम तयार करण्याची CSK ची रणनिती असेल. CSK च्या पर्समध्ये मोठी रक्कम आहे, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. म्हणजे ज्या खेळाडूंना विकत घ्यायच असेल, त्यांच्यासाठी मोठी रक्कम मोजण्याची CSK ची तयारी असेल.

CSK च्या पर्समध्ये 31 कोटी रुपये आहेत. आपला स्लॉट पूर्ण करण्यासाठी त्यांना 6 खेळाडूंची आवश्यकता आहे. यात 3 परदेशी खेळाडू असू शकतात. सीएसकने ऑक्शनआधी बेन स्टोक्ससारख्या मोठ्या प्लेयरला रिलीज केलय. त्यामुळे सीएसकेला एका स्टार ऑलराऊंडरची आवश्यकता आहे. सीएसके रचिन रवींद्रला टीममध्ये घेण्यासाठी पूर्ण ताकत झोकेल अशी शक्यता आहे.

CSK ने कुठल्या खेळाडूंना रिलीज केलय?

बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस, अंबाति रायुडू, सिसंदा मगाला, काइल जॅमिसन, भगत वर्मा, आकाश सिंह, सुभ्रांशु सेनापति

चेन्नई सुपरकिंग्सची टीम

एमएस धोनी (कॅप्टन), डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड़, अजिंक्य रहाणे, शेख राशिद, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोइन अली, शिवम दुबे, निशांत सिंधु, अजय मंडल, राज्यवर्धन हंगरगेकर, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, मथीश पथिराना.

चेन्नई सुपर किंग्सने पाचवेळा आयपीएलच जेतेपद मिळवलय. यावेळी ट्रॉफी जिंकून धोनीला निरोप देण्याचा प्रयत्न असेल. चेन्नईने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये आयपीएलच विजेतेपद मिळवलय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.