What is DEXA: काय आहे DEXA टेस्ट? टीम इंडियात सिलेक्शनसाठी ही टेस्ट पास होणं आवश्यक
What is DEXA: बीसीसीआयने एक निर्णय घेतला आहे. टीम इंडियात सिलेक्शनसाठी खेळाडूंना ही टेस्ट पास करावीच लागेल. काय आहे DEXA टेस्ट?
मुंबई: टीम इंडियाला वर्ष 2022 मध्ये मोठ्या प्रमाणता दुखापतीचा सामना करावा लागला. अनेक खेळाडू दुखापतीमुळे महत्त्वाच्या टुर्नामेंटमध्ये खेळू शकले नाहीत. जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजासारख्या स्टार खेळाडूंचा दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये समावेश होतो. बुमराह आणि जाडेजाची उणीव टीम इंडियाला जाणवली. भारतीय क्रिकेट बोर्डाने आता खेळाडूंच्या दुखापतीचा सामना करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय.
यो-यो प्रमाणेच डेक्सा टेस्ट
आता खेळाडूंच्या सिलेक्शनचा आधार यो-यो टेस्टप्रमाणे डेक्सा टेस्टही असेल. डेक्सा स्कॅनमध्ये काही समस्या दिसल्यास खेळाडूंच सिलेक्शन होणार नाही. खेळाडूंना आता टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी यो-यो प्रमाणेच डेक्सा टेस्ट सुद्धा पास करावी लागेल.
काय आहे DEXA टेस्ट?
डेक्सा एकप्रकारची बोन डेंसिटी टेस्ट आहे. या पूर्ण प्रोसेसमध्ये एक्स-रे टेक्निकचा वापर केला जातो. डेक्सा एक सुरक्षित, वेदनारहित लवकर होणारी टेस्ट आहे. हाडांची मजबूती या टेस्टमधून समजणार आहे. या टेस्टमध्ये दोन प्रकारची बीम तयार होते. एका बीममध्ये ऊर्जा जास्त असते. दुसऱ्या बीममध्ये ऊर्जा कमी असते. दोन्ही बीम हाडांच्या आतून जाऊन एक्स-रे काढतात.
DEXA टेस्टच महत्त्व काय?
डेक्सा मशीनव्दारे ही संपूर्ण प्रोसेस केली जाते. या स्कॅनमधून हाडांमध्ये कशा प्रकारच फ्रॅक्चर होऊ शकतं, त्याचा अंदाज बांधता येतो. या टेस्टमधून बॉडी फॅट, वजन आणि टिश्यूबद्दल माहिती मिळते. 10 मिनिटाच्या या टेस्टमधून कुठला खेळाडू शारीरिक दृष्टया किती फिट आहे, ते समजणार आहे. डेक्साच दुसरं नाव बोन डेंसिटी टेस्ट आहे. टीम इंडियात निवडीआधी एक महत्त्वाचा सल्ला
बीसीसीआयची मुंबईमध्ये रिव्यु मीटिंग झाली. भारतीय टीममध्ये निवडीआधी खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटचा चांगला अनुभव असला पाहिजे, असा सल्ला सुद्धा देण्यात आला. टीम इंडिया सध्या 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरु होणाऱ्या टी 20 सीरीजच्या तयारीत व्यस्त आहे. टी 20 सीरीजनंतर दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची वनडे सीरीज होईल. टी 20 सीरीजमध्ये हार्दिक आणि वनडे सीरीजमध्ये रोहित शर्मा कॅप्टन आहे.