Mumbai Indians Players List For IPL 2024 | आज मुंबई इंडियन्स कुठल्या प्लेयरवर कोट्यावधी रुपये खर्च करणार?

Mumbai Indians Players List For IPL 2024 | आज दुबईमध्ये पुढच्यावर्षी होणाऱ्या आयपीएल सीजनसाठी ऑक्शन सोहळा रंगणार आहे. सगळ्यांची नजर आयपीएलमधील लोकप्रिय टीम मुंबई इंडियन्सवर असेल. आजच्या ऑक्शनवर टीमचा नवीन कॅप्टन हार्दिक पांड्याची छाप दिसून येईल.

Mumbai Indians Players List For IPL 2024 | आज मुंबई इंडियन्स कुठल्या प्लेयरवर कोट्यावधी रुपये खर्च करणार?
IPL 2024 Auction Mumbai Indians
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 10:34 AM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2024 च मिनी ऑक्शन आज 19 डिसेंबरला दुबईमध्ये होत आहे. ऑक्शनच्या आधी सर्वात जास्त चर्चा मुंबई इंडियन्सची आहे. मुंबई इंडियन्सने थेट कर्णधार बदलला. रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवलं. फ्रेंचायजीच्या या निर्णयाने सगळेच हैराण आहेत. आता ऑक्शनमध्ये या टीमची काय रणनिती असेल, याकडे सगळ्यांच लक्ष आहे. पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्ससमोर नव्या सीजनसाठी नवीन कॉम्बिनेशन तयार करण्याच आव्हान आहे. कॅप्टनशिपवरुनही डिबेट सुरु आहे. मुंबई इंडियन्सने ऑक्शनआधी हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवलं. गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला ट्रेड केलं.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने डेब्युमध्येच विजेतेपदाला गवसणी घातली. यंदाच्यावर्षी टीमला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सने थेट हार्दिक पांड्यालाच कॅप्टन म्हणून संघात घेतलं. हार्दिक पांड्या याआधी मुंबई इंडियन्सचा सदस्य होता. त्यामुळे त्याला मुंबई इंडियन्सच्या संस्कृतीची कल्पना आहे.

मुंबई इंडियन्सकडे किती रक्कम शिल्लक?

मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये सध्या 17.75 कोटी रुपये आहेत. टीमला आपला स्लॉट फुल करण्यासाठी 8 खेळाडूंची गरज आहे. यात 4 परदेशी खेळाडू भरता येऊ शकतात. मुंबई इंडियन्सने ऑलराऊंडर कॅमरुन ग्रीनला ट्रेड केलं होतं. आता आणखी एक मोठ्या ऑलराऊंडरला टीममध्ये घेण्याचा मुंबई इंडियन्सचा प्रयत्न असेल.

मुंबई इंडियन्सने कुठल्या प्लेयर्सना रिलीज केलय?

जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, दुयान यानसेन, झाय रिचर्डसनस, रिले मेरेडिथ, क्रिस जॉर्डन, अरशद खान, रमनदीप सिंह, ऋतिक शौकीन, राघव गोयल, संदीप वॉरियर

मुंबई इंडियन्सचा स्क्वॉड

हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मढवाल, जेसन बेहरनडॉर्फ, हार्दिक पंड्या आणि रोमारियो शेफर्ड.

मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील एक यशस्वी संघ आहे. मुंबई इंडियन्सने पाचवेळा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली किताब जिंकला आहे. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये मुंबई इंडियन्सने आयपीएलची ट्रॉफी उंचावली. मागच्या तीन वर्षात मुंबई इंडियन्सला विजेतेपदाने हुलकावणी दिली. आता नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न असेल.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.