IND vs ENG | एक दिवस राहिला, जसप्रीत बुमराह कुठे गायब झाला?
IND vs ENG | राजकोट टेस्ट सुरु व्हायला आता जास्त वेळ उरलेला नाहीय. 15 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु होईल. 15 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या कसोटी सामन्याची तयारी सुरु आहे. पण या खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराहच नाव नाहीय.
IND vs ENG | टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराहबद्दल महत्त्वाची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जसप्रीत बुमराह अजून राजकोटमध्ये पोहोचलेला नाही. भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना राजकोट येथे होणार आहे. 15 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या कसोटी सामन्याची तयारी सुरु आहे. पण या खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराहच नाव नाहीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार जसप्रीत बुमराह टीमच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा दिसलेला नाही.
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार,जसप्रीत बुमराह लवकरच टीम इंडियात दाखल होईल, बीसीसीआय सूत्रांनी ही माहिती दिली. टीम इंडिया 11 फेब्रुवारीपासूनच राजकोटमध्ये आहे. जसप्रीत बुमराह आज टीममध्ये दाखल होईल असं बोलल जातय. आधी असं बोलल जात होतं की, बुमराहला तिसऱ्या कसोटीसाठी आराम दिला जाईल. पण आता तो या कसोटीत खेळणार हे निश्चित आहे. बुमराहला रांची कसोटीत आराम दिला जाऊ शकतो.
म्हणून बुमराह हवाच
जसप्रीत बुमराहने या टेस्ट सीरीजमध्ये कमालीच प्रदर्शन केलय. तो या सीरीजमधील टॉप विकेट-टेकर आहे. स्पिन फ्रेंडली विकेटवर या गोलंदाजाने दोन कसोटीत 15 विकेट घेतलेत. मागच्या कसोटीत पहिल्या इनिंगमध्ये त्याने 6 विकेट घेतल्या होत्या. टीमच्या विजयात त्याच महत्त्वाच योगदान होतं. त्यामुळेच टीम इंडियाने सीरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली. राजकोट टेस्ट मॅच महत्त्वाची आहे, कारण टीम इंडियाला सीरीजमध्ये आघाडी आवश्यक आहे. त्यासाठी बुमराहच तिसऱ्या कसोटीत खेळण आवश्यक आहे.
फिरकी गोलंदाजांनी किती विकेट घेतलेत?
भारतीय भूमीवर टीम इंडियाचा विजय आणि पराजय स्पिनर्स निश्चित करतात. या सीरीजमध्ये फिरकी गोलंदाजांची कामगिरी तशी सरासरीच आहे. अश्विनने 2 कसोटीत 9 विकेट घेतल्या आहेत. अक्षरने तितक्याच कसोटी सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. पहिल्या कसोटीत खेळणाऱ्या रवींद्र जाडेजानेही पाच विकेट काढल्या आहेत.