बापरे… स्वामी विवेकानंद यांनी क्रिकेटमध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं…हे आहे त्यागील इंटरेस्टिंग कारण !!

त्याकाळी इंग्रजांच्या कलकत्ता क्रिकेट क्लब आणि बंगाली भाषिक लोकांचे वर्चस्व असलेल्या टाऊन क्लब यांच्या दरम्यान इडन गार्डनमध्ये सामना भरवण्यात आला होता. ऐतिहासिक सामन्यात नरेंद्रनाथ मैदानात वर्चस्व प्रस्थापित करत होते त्यांनी एका मागोमाग एक असे तब्बल 7 विकेट घेतली..

बापरे... स्वामी विवेकानंद यांनी क्रिकेटमध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं...हे आहे त्यागील इंटरेस्टिंग कारण !!
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 5:37 PM

Swami Vivekananda Jayanti 2022: उठा जागे व्हा आणि तोपर्यंत संघर्ष करा जोपर्यंत लक्ष मिळणार नाही. जेवढा मोठा संघर्ष होईल विजय सुद्धा तितकाच शानदार होईल.. हजारो ठेच खाल्ल्यानंतर एका चांगल्या चरित्राचे निर्माण होत असते असे स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda)यांचे असे अनेक कोट्स आहेत, विचार आहेत, जी सदैव आपल्याला प्रेरित करत असतात. आज त्यांची जयंती आहे आणि या निमित्ताने देशभरात राष्ट्रीय युवा दिवस (National Youth Day)साजरा केला जातो.

स्वामी विवेकानंद हे देश आणि जगामध्ये आदर्श मानले जातात. एक प्रखर व्यक्ती ,वक्ता ,विद्वान, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, लेखक, गीतकार,राष्ट्रभक्त आणि आणखीन अनेक रूपांनी दुनिया त्यांना ओळखते आणि त्यांच्या विचारांचा फॉलो करतेय मात्र तुम्हाला माहिती आहे का की एक खेळाडू म्हणून विवेकानंद कसे होते?

तेव्हा ते युवा नरेंद्र नाथ दत्त(Narendra Nath Datta) या नावाने ओळखले जात असे. तरुणांमध्ये केवळ क्रिकेट नाही तर फुटबॉल बॉक्सिंग आणि फॅसिंग मध्ये सुद्धा विवेकानंद यांची आवड होती न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार स्वामी विवेकानंद एक चांगले क्रिकेटर होते.

ते क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर होते, जीवनामध्ये त्यांच्या आदर्श आणि विचारांनी प्रभावित असणारी युवा पिढी सुद्धा त्यांच्या जीवनातील या गोष्टीबद्दल अनभिज्ञ राहिले. चला तर मग जाणून घवूयात क्रिकेटर नरेंद्रनाथ यांच्या रूपात स्वामी विवेकानंद यांच्या शानदार प्रदर्शनाबाबत.

कलकत्ता येथे आयोजित करण्यात आलेला सामना :

एका रिपोर्टनुसार स्वामी विवेकानंदा क्रिकेटमध्ये इंग्रजांवर चांगले भारी पडले होते त्यांनी कलकत्ता (आताचे कोलकाता) येथील ईडन गार्डन एचडी मध्ये इंग्रजांच्या सात फलंदाजांना आउट केले होते जवळपास 135 वर्ष आधी त्यांनी ही कमाल केली होती.

त्या वेळेला कलकत्ता ही देशाची राजधानी होती. ही गोष्ट आहे 1980च्या दशकातली जेव्हा इडन गार्डन तयार होऊन जवळपास वीस वर्ष झाले होते. त्यावेळेस नरेंद्रनाथ टाऊन क्रिकेट क्लबचे सदस्य होते आणि शारीरिक तंदुरुस्तीवर ते खूप लक्ष देत असत.

ब्रिटिश इंडियामध्ये क्रिकेट ग्रंथांसाठी मनोरंजनाचा विषय होता. इंग्रजांसोबत हा खेळ कालांतराने भारतात सुद्धा पसंत केला जाऊ लागला आणि देशातील विविध भागांमध्ये हा खेळला जाऊ लागला. कलकत्तामध्ये क्रिकेटचे अनेक क्लब सुरू झाले आणि युवावर्ग या खेळात सहभागी होऊ लागला. कलकत्ता ईडन गार्डनमध्ये झालेल्या एका सामन्यात नरेंद्रनाथांनी इंग्रजांचे सात फलंदाज माघारी धाडले होते.

क्रिकेटमध्ये कसे आले विवेकानंद?

या सामन्याबद्दल जाणून घेण्याआधी थोडे मागे जाऊन आपण काही गोष्टी समजून घेऊया. 1792 मध्ये इंग्रजांनी कलकत्ता क्रिकेट क्लब बनवला. हा ब्रिटनच्या भारतात सर्वात जुना क्रिकेट क्लब आहे. द ब्रिजच्या रिपोर्टनुसार कलकत्ता येथील दुसरा क्रिकेट क्लब 1884 मध्ये तयार झाला. ज्याला बंगाली बांधवांनी बनवले होते आणि त्याला टाऊन क्लब असे नाव दिले. गणिताचे प्रोफेसर शरद रंजन रे हे सुद्धा याच्यात सहभागी होते ते सत्यजित रे यांचे दादा उपेंद्र किशोर यांचे मोठे भाऊ होते आणि एक सक्षम खेळाडू सुद्धा होते. त्यांनी इंग्रजांना त्यांच्या पारंपरिक खेळात हरवण्याच्या ध्यासाने हा क्लब तयार केला होता.

रिपोर्टनुसार या क्रिकेट क्लबमध्ये समाजातील विभिन्न वर्गांची भागीदारी होती. ब्रिटिश इंडिया मध्ये तेव्हा युवांच्या मनामध्ये राष्ट्रीय भावना अधिक प्रमाणात जागृत होत्या. विवेकानंद राष्ट्रवादी भावनांनी पूर्णपणे ओतप्रोत असे युवा होते आणि इतर युवांना प्रभावित करण्याची क्षमता ते ठेवत असत. त्या वेळेला स्वातंत्र्य सेनानी असलेले हेमचंद्र घोष यांनी नरेंद्रनाथ यांना क्रिकेट खेळणे बाबत विचारले तेव्हा ते आनंदाने तयार झाले यानंतर त्यांच्याकडूनच त्यांनी क्रिकेटचे मार्गदर्शन घेऊन चांगले गोलंदाज बनले. विवेकानंद यांची फलंदाजी सुद्धा उत्कृष्ट होती.

नरेंद्रनाथ यांची घातक गोलंदाजी साथ इंग्रजांना माघारी पाठविले.. कलकत्ता क्रिकेट क्लब (Calcutta Cricket Club) आणि टाऊन क्लब(Town Club) यांच्या दरम्यान इडन गार्डनमध्ये सामना ठरला होता. या ऐतिहासिक सामन्यात नरेंद्रनाथ यांनी टाऊन क्लब क्रिकेट संघाकडून खेळताना ब्रिटिश खेळाडूंना अक्षरशः भरी पडले. या मॅचमध्ये घोष यांनी विवेकानंद यांना त्यांच्या गोलंदाजीवर फोकस करण्याचा सल्ला दिला. यानंतर विवेकानंद यांनी मैदानात अक्षरशः अप्रतिम कामगिरी केली. त्यांनी एका मागोमाग एक असे इंग्रजांचे सात फलंदाज माघारी धाडले..

महत्त्वाची गोष्ट ही की इंग्रजांच्या त्यावेळेला 20 धावा आणि त्यांचे 7 गडी माघारी परतले होते. त्यांचा संपूर्ण डाव गडगडला होता. या सामन्याच्या निकालाबाबत पूर्ण माहिती तर मिळत नाही, मात्र असे सांगितले जाते की टाऊन क्लबने नरेंद्रनाथ यांच्या घातक गोलंदाजीमुळे खूप शानदार प्रदर्शन केले होते.

क्रिकेटर म्हणून त्यांनी आपली ही इनिंग पुढे सुरू ठेवली नाही, मात्र आपल्या आयुष्याचा पूर्णवेळ राष्ट्राला समर्पित केला आणि जनजागृती केली. आदर्शांचे पालन करत ते एक महान विचारक बनले. त्यांनी देशातील युवावर्गाला जागरूक केले आणि जगभरात मानवतेचा संदेश पसरवला..

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.