Shreyas iyer: कोहली, सूर्यकुमार परतल्यानंतर श्रेयसने कुठल्या पोझिशनवर बॅटिंगला यावं? गावस्करांनी दिलं उत्तर

श्रेयस अय्यर (Shreyas iyer) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत श्रेयसने प्रतिस्पर्धी संघाला आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. त्याने सलग तीन अर्धशतक झळकवली.

Shreyas iyer: कोहली, सूर्यकुमार परतल्यानंतर श्रेयसने कुठल्या पोझिशनवर बॅटिंगला यावं? गावस्करांनी दिलं उत्तर
सुनील गावस्कर-श्रेयस अय्यर
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 11:47 AM

मुंबई: श्रेयस अय्यर (Shreyas iyer) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत श्रेयसने प्रतिस्पर्धी संघाला आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. त्याने सलग तीन अर्धशतक झळकवली. श्रेयसच्या या कामगिरीमुळे टीम मॅनेजमेंटसमोर संघ निवडीचा पेच वाढणार आहे. खरंतर रोहित शर्मा, (Rohit sharma) संघ व्यवस्थापनही T 20 वर्ल्डकपसाठी संघ निवड करताना अशा प्रकारच्या डोकेदुखीमुळे आनंदी असेलं. श्रेयसने श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Srilanka) पहिल्या टी 20 मध्ये 57, दुसऱ्या सामन्यात 74 आणि तिसऱ्या सामन्यात 73 धावांची खेळी केली. आक्रमकतेबरोबरच परिस्थितीत ओळखून खेळण्याचं भानही श्रेयसच्या फलंदाजीत दिसून आलं. विराटच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली, त्याचा श्रेयसने पुरेपूर फायदा उचलला. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव संघात परतल्यानंतर श्रेयसने कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करावी, या बद्दल भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आपलं मत मांडलं आहे.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्याआधी संघ व्यवस्थापनाने विराट कोहलीला विश्रांती दिली. त्यावेळी श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळालं. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने 16 चेंडूत 25 धावांची खेळी केली. त्यानतंर श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 सामन्यात त्याने 204 धावा केल्या. यात तीन नाबाद अर्धशतक आहेत.

विराट आला मग श्रेयस कुठे?

विराट कोहली संघात परतल्यानंतर श्रेयस अय्यरला पुन्हा खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात येईल. सूर्यकुमार यादवही प्रबळ दावेदार आहे. सूर्यकुमारने वेस्ट इंडिज विरुद्ध संपलेल्या टी 20 मालिकेत जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यानंतर ऋषभ पंतही आहे. मग यामध्ये श्रेयस अय्यर कुठे फिट बसतो?

गावस्कर म्हणतात…

स्टार स्पोटर्सवर बोलताना सुनील गावस्करांनी ही एक समस्या असल्याचं मान्य केलं. “विराट कोहलीची जागा हलवता येणार नाही, असं गावस्करांना वाटतं. सूर्यकुमारसोबत चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर फिट बसू शकतो” असं गावस्करांच मत आहे.

“विराट कोहलीची फलंदाजीची जागा तुम्ही बदलू शकत नाही. तो तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजीसाठी येईल. याबद्दक कुठलीही शंका नाही. पण त्यावेळी तुम्ही श्रेयस अय्यर सारख्या फलंदाजाला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर पाठवू शकता” असं गावस्कर म्हणाले.

When virat surya kumar returns on which number Shreyas iyer should batted sunil gavaskar answers

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.