Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS WTC Final 2023 : फायनल मॅच मोबाइल फोनवर Free मध्ये पाहता येणार?

IND vs AUS WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळली जाणार आहे. ही मॅच मोबाइल फोनवर Free मध्ये पाहता येईल का? असा क्रिकेट चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे.

IND vs AUS WTC Final 2023 : फायनल मॅच मोबाइल फोनवर Free मध्ये पाहता येणार?
ind vs aus wtc final 2023 Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 7:45 AM

लंडन : टीम इंडियाने वर्ल्ड चॅम्पियनशिपची ट्रॉफी सोडून आयसीसीचे सर्व किताब जिंकले आहेत. यावेळी भारताची नजर WTC Final जिंकण्यावर आहे. भारतासमोर ऑस्ट्रेलियाच आव्हान आहे. लंडनच्या द केनिंग्टन ओव्हल मैदानात फायनलचा सामना रंगणार आहे. IPL 2023 चे सामने जियो सिनेमाने मोबाइल फोनवर फ्रिमध्ये दाखवले होते. पण आता WTC फायनल मॅच मोबाइलवर फ्रिमध्ये पाहता येणार नाही.

टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा WTC च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणारा फायनलचा सामना भारतात स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल.

मोबाइलवर मॅच पाहण्यासाठी काय कराल?

मोबाइलवर डिज्नी प्लस हॉटस्टारवर फायनल पाहता येईल. मोबाइल फोनवर मॅच पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना डिज्नी प्लस हॉटस्टारच सबस्क्रिप्शन घ्याव लागेल. म्हणजे App डाऊनलोड केल्यानंतर विकत घ्यावं लागेल.

टीव्हीवर कुठे Free मध्ये पाहू शकता?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल स्टार स्पोर्ट्ससह डीडी स्पोर्ट्स या फ्रि टू एयर चॅनलवर दाखवली जाईल. डीडी इंडियाने अधिकृत दुजोरा दिलाय. त्यासाठी तुम्हाला डीडी स्पोर्ट्स 1.0 (फ्री डिश) आणि डीडी भारतीची 1.0 (फ्री डिश) गरज आहे. त्यावर तुम्ही मॅच पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

किती वाजता सुरु होणार सामना ?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान 7 ते 11 जून दरम्यान खेळली जाणार आहे. या सामन्यात एक रिझर्व्ह डे सुद्धा ठेवला आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर ही मॅच होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान भारतीय वेळेनुसार, दुपारी 3.00 वाजता मॅच सुरु होईल.

WTC फायनलसाठी दोन्ही टीम्सचे स्क्वाड

टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जैसवाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव. ऑस्ट्रेलियाची 15 सदस्यीय टीम

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्कॉट बोलंड, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, जॉश इंग्लस (विकेटकीपर), उस्मान ख़्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, टॉड मर्फ़ी, स्टीवन स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेविड वॉर्नर.

स्टँडबाय खिळाडू : मिचेल मार्श, मॅट रेनशॉ.

विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ
विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ.
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी.
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर.
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा..
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा...
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही.
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल.
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.