IPL 2022: CSK मध्ये दीपक चाहरची जागा कोण घेऊ शकतं? वसीम जाफर यांनी सुचवले पर्याय

IPL 2022: IPL स्पर्धा सुरु व्हायला काही दिवसांचा अवधी उरलेला असताना दीपक चाहरच्या (Deepak chahar) दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्सची चिंता वाढली आहे.

IPL 2022: CSK मध्ये दीपक चाहरची जागा कोण घेऊ शकतं? वसीम जाफर यांनी सुचवले पर्याय
IPL 2022: दीपक चाहर Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 7:05 AM

मुंबई: IPL स्पर्धा सुरु व्हायला काही दिवसांचा अवधी उरलेला असताना दीपक चाहरच्या (Deepak chahar) दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्सची चिंता वाढली आहे. दीपक चाहर या सीजनमध्ये खेळू शकतो की, नाही हे येत्या एक-दोन दिवसात स्पष्ट होईल. दीपक चाहरच्या दुखापतीबद्दल नॅशनल क्रिकेट एकडमीकडून एमएस धोनीच्या टीमला रिपोर्ट मिळणार आहे. या स्टेटस रिपोर्टवरुन दीपक चाहर यंदाच्या 15 व्या सीजनमध्ये खेळू शकणार की, नाही ते स्पष्ट होईल. “दीपक चाहरच्या दुखापतीच्या सद्य स्थितीबद्दल अजून आम्हाला NCA किंवा BCCI कडून काही समजलेलं नाही. या टप्प्यावर आम्ही अजून दीपक चाहरच्या जागी बदली खेळाडूचा विचार केलेला नाही. आयपीएलच्या पुढच्या स्टेजमध्ये तो खेळण्यासाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे” असं CSK चे सीईओ कासी विश्वनाथन यांनी इनसाइट स्पोर्टसला सांगितलं.

दीपक चाहर सीएसकेचा महागडा खेळाडू आहे. त्याला तब्बल 14 कोटी रुपये मोजून मेगा ऑक्शनमध्ये सीएसकेन विकत घेतलं आहे, सीएसकेच्या रणनितीचा दीपक चाहर एक मुख्य भाग आहे. वरप्लेच्या षटकात विकेट काढण्याची दीपक चाहरची खासियत आहे. त्याशिवाय आपल्या बॅटनेही तो प्रतिस्पर्धी संघाला तडाखा देऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेची त्याची प्रचिती आली आहे.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना दीपक चाहरला हॅमस्ट्रिंगमध्ये क्वाड्रिसेप्स टीयरची दुखापत झाली आहे. या दुखापतीमधून पूर्णपणे बरं होण्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागेल, असं सुरुवातीला बोललं जात होतं. पण आता अशी कुठलीही शस्त्रक्रिया करुन घेण्याची आवश्यकता नाही, असं वृत्त काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाने दिलं होतं.

वसीम जाफर यांनी सुचवले पर्याय

दीपक चाहर आयपीएलचे सुरुवातीचे काही आठवडे किंवा संपूर्ण सीजनला मुकणार असेल, तर त्याच्याजागी कोणाला संधी द्यायची? याबद्दल माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी काही पर्याय सुचवले आहेत. दीपक चाहरच्या जागी तृषार देशपांडे, सीमरजीत सिंह आणि मुकेश चौधरीचा पर्याय पावरप्लेच्या षटकांसाठी धोनीकडे उपलब्ध आहे, असं जाफर यांनी सांगितलं. मुंबईच्या खेळपट्ट्यांवर थोडा वेग लागतो. त्यामुळे ही मुलं खेळू शकतात, असं जाफर इएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.