PBKS vs LSG 2023 : पंजाबकडून एकटा महाराष्ट्राचा मुलगा लढला, कोण आहे अर्थव तायडे? VIDEO

PBKS vs LSG 2023 : अनुभवी फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतत असताना त्याने पंजाबची बाजू लावून धरली. अर्थव तायडेच्या खेळाने मन जिंकून घेतलं. टॅलेंट असल्याने महाराष्ट्राच्या या युवा खेळाडूला पंजाब किंग्सने सातत्याने संधी दिली.

PBKS vs LSG 2023 : पंजाबकडून एकटा महाराष्ट्राचा मुलगा लढला, कोण आहे अर्थव तायडे? VIDEO
atrav taide pbks ipl 2023
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 9:19 AM

मोहाली : पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये काल सामना झाला. या मॅचमध्ये लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सवर मोठा विजय मिळवला. लखनौसमोर पंजाबच काही चाललं नाही. लखनौच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांची जाम धुलाई केली. केएल राहुलच्या लखनौ टीमने पहिली बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 257 धावा चोपल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा डाव 201 धावात आटोपला.

लखनौकडून काल मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक 72, काइल मेयर्स 54, आयुष बदोनी 43 आणि निकोलस पूरनने 45 धावा फटकावल्या. या बॅट्समनच्या बळावर लखनौ टीमने पंजाबसमोर विशाल लक्ष्य ठेवलं.

अर्थव तायडे पंजाबच्या मदतीला धावून आला

या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची निराशाजनक सुरुवात झाली. 31 धावात त्यांचे दोन्ही ओपनर तंबूत परतले. प्रभसिमरन सिंह 9 आणि कॅप्टन शिखर धवन 1 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर अर्थव तायडे या महाराष्ट्राच्या युवा खेळाडूने पंजाबचा डाव सावरला. त्याने 36 चेंडूत 66 धावा फटकावल्या. यात 8 फोर आणि 2 सिक्स आहेत.

अर्थवला पंजाबने किती किंमतीला विकत घेतलय?

पंजाबकडून महाराष्ट्राचा पठ्ठया अर्थव तायडे एकटा लढला. मूळचा विदर्भाचा असलेल्या अर्थवला पंजाब किंग्सने 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसला विकत घेतलय. हा त्याचा दुसरा आयपीएल सीजन आहे. लखनौ विरुद्ध त्याने आयपीएलमधील पहिलीच हाफ सेंच्युरी झळकवली.

अर्थव महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यातील आहे?

अर्थव तायडे 22 वर्षांचा आहे. आयपीएलचा सीजन सुरु होण्याआधी त्याने मागच्या रणजी सीजनमध्ये 499 धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि तीन अर्धशतक आहेत. अर्थव मूळचा महाराष्ट्रातील अकोल्याचा आहे. लेफ्टी बॅटिंग आणि लेफ्टी स्पिन गोलंदाजी तो करतो.

याआधीच्या तीन आयपीएल सामन्यात किती धावा केल्या?

शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे पंजाब किंग्सने त्याला यंदाच्या सीजनमध्ये संधी दिली होती. कारण पंजाबला त्यामुळे शिखरच्या जागही लेफ्टी बॅट्समनचा ऑप्शन मिळाला. हा त्याचा चौथा सामना होता. याआधीच्या तीन सामन्यात त्याने लखनौ विरुद्ध 0, RCB विरुद्ध 4 आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध 29 धावा केल्या. अर्थव तायडेकडे कौशल्य असल्याने पंजाब किंग्सची टीम त्याला सातत्याने संधी देत आहे. आता चौथ्या मॅचमध्ये त्याने त्याच्या प्रतिभेला साजेसा खेळ केला. महाराष्ट्राचा हा खेळाडू एकटा पंजाबसाठी लढला.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.