Who is Ayush Badoni: 20 लाखांमध्ये विकत घेतलेला 22 वर्षाचा मुलगा लखनौचा संकटमोचक, हार्दिक, राशिदची गोलंदाजी चोपली
Who is Ayush Badoni: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स (LSG vs GT) या सामन्यात एका 22 वर्षाच्या मुलाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. त्याचं नाव आहे आयुष बदोनी.
मुंबई: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स (LSG vs GT) या सामन्यात एका 22 वर्षाच्या मुलाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. त्याचं नाव आहे आयुष बदोनी. (Ayush Badoni) आयुषने आज आपल्या बॅटचा चांगलाच हिसका दाखवला. आयपीएलमध्ये (IPL) त्याने लखनौ संघाकडून डेब्यू केला. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात त्याने चमकदार खेळ दाखवला. समोर राशिद खान, हार्दिक, पंड्या, मोहम्मद शमी सारखे गोलंदाज होते. पण त्यांचा सामना करताना तो डगमगला नाही. उलट त्यांच्या गोलंदाजीवर तो तुटून पडला. लखनौचा डाव अडचणीत सापडला होता. 29 धावात चार विकेट गेल्या होत्या. त्यावेळी त्याने अनुभवी दीपक हुड्डा सोबत मिळून पाचव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली व लखनौला संकटातून बाहेर काढलं.
अनुभवी कुणाल पंड्याला मागे ठेवलं
कुणाल पंड्यासारखा अनुभवी फलंदाज असताना आयुष बदोनीला फलंदाजीसाठी वरती पाठवलं. तो निर्णय योग्य ठरला. बदोनीने खेळपट्टीवर सेट होण्यासाठी थोडावेळ घेतला. पहिल्या 22 चेंडूत 13 धावा केल्या. पण त्यानंतर फलंदाजीचा गिअर बदलला. हार्दिक पंड्याच्या एक ओव्हरमध्ये 15 धावा वसूल केल्या. यात एक षटकार आणि चार चौकार होते. राशिद खानला तर थेट षटकार ठोकला. आयुषने षटकार ठोकून आपलं अर्धशतक पूर्ण केलं. 41 चेंडूत त्याने 54 धावा केल्या. यात चार चौकार आणि तीन षटकार होते.
First half century for our young dynamite in his debut – Ayush Badoni!
आरंभ है प्रचंड ? आईपीएल की पहली पारी में ही आयुष ने जड़ा अपना पहला अर्धशतक ?#AbApniBaariHai#LSG #GTvsLSG #IPL2022 pic.twitter.com/G95ZE7I7x8
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 28, 2022
किती लाखांमध्ये विकत घेतलं?
मागच्या महिन्यात झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये आयुषला लखनौ सुपर जायंट्सने त्याच्या बेस प्राइसला म्हणजे 20 लाख रुपयांना विकत घेतलं होतं. आयुषय बदानी हे नाव सर्वप्रथम 2018 च्या आशिया कप स्पर्धेवेळी चर्चेत आलं होतं. त्याने श्रीलंकेविरुद्ध 28 चेंडूत 52 धावांची खेळी केली होती. आयुष आता फक्त 22 वर्षांचा आहे. त्याने जानेवारी 2021 मध्ये T-20 मध्ये डेब्यु केला. टी 20 मध्ये त्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये फक्त पाच सामने खेळले आहेत. 29 धावात चार विकेट गमावणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने जोरदार कमबॅक केलं. निर्धारीत 20 षटकात त्यांनी सहा बाद 158 धावा केल्या. दीपक हुड्डा आणि आयुष बदोनीमुळे लखनौला कमबॅक करता आलं. दोघांनी अर्धशतकी खेळी केली. दीपक हुड्डाने (55) तर आयुष बदोनीने (54) धावा केल्या. लखनौकडून मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात 25 धावा देत तीन विकेट घेतल्या.