Hrishikesh Kanitkar: …आणि अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या संघाचे पुणेकर कोच कानिटकरांनी पाकिस्तानला दिला होता तडाखा

पाकचे स्वप्न धुळीस मिळवले होते. हृषिकेश कानिटकरांनी पाकिस्तान विरुद्ध असाच विजय मिळवून दिला होता.

Hrishikesh Kanitkar: ...आणि अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या संघाचे पुणेकर कोच कानिटकरांनी पाकिस्तानला दिला होता तडाखा
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 11:29 AM

मुंबई: भारताने शनिवारी पाचव्यांदा अंडर 19 चा वर्ल्डकप जिंकला. (ICC U 19 world cup Champion) अंडर 19 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा भारत हा क्रिकेट जगतातील पहिला संघ आहे. सलग चौथ्यांदा भारताने अंडर 19 वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली होती. अशी कामगिरी करणं आतापर्यंत अन्य कुठल्याही देशाला जमलेलं नाही. भारताच्या वर्ल्डकप विजयाचं सर्वाधिक श्रेय या संघातील प्रतिभावान खेळाडूंना आहेच. पण त्याचबरोबर अंडर 19 टीमचे कोच हृषिकेश कानिटकर (Hrishikesh Kanitkar) यांनाही जातं. संघाची बांधणी करण्यात, रणनिती आखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताने शनिवारी इंग्लंडला चार विकेटने हरवून पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्डकपचं विजेतेपद पटकावलं. दिनेश बावाने (Dinesh bawa) सलग दोन षटकार खेचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हृषिकेश कानिटकरांनीही पाकिस्तान विरुद्ध असाच विजय मिळवून दिला होता.

बावाच्या बॅटमधून निघालेल्या विजयी षटकाराने 2011 वर्ल्डकप फायनलमधील महेंद्रसिंह धोनीच्या षटकाराची आठवण करुन दिली. विद्यमान वर्ल्डकप विजेत्या संघाचे कोच हृषिकेश कानिटकर यांनी सुद्धा काही वर्षांपूर्वी भारताला असाच रोमहर्षक विजय मिळवून दिला होता. कदाचित क्रिकेटप्रेमी विसरले असतील, पण हृषिकेश कानिटकर पाकिस्तानी गोलंदाजाची धुलाई करुन रातोरात स्टार बनले होते. त्यांच्या एका फटक्याने पाकिस्तानचं विजेतेपदाचं स्वप्न धुळीस मिळवलं होतं.

समोर पाकिस्तानचा सकलेन मुश्ताक गोलंदाजी करत होता 18 जानेवारी 1998 चा दिवस होता. हृषिकेश कानिटकर आपल्या करीयरमधील तिसरी वनडे मॅच खेळत होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये इंडपेंडेंस कपच्या जेतेपदासाठी सामना सुरु होता. भारताला विजयासाठी 48 षटकात 315 धावांची आवश्यकता होती. भारताला शेवटच्या दोन चेंडूत विजयासाठी 3 धावांची आवश्यकता होती. कानिटकर त्यावेळी स्ट्राइकवर होते. समोर पाकिस्तानचा अनुभवी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक होता. शेवटचं षटक तो टाकत होता. त्यामुळे भारताच्या विजयाची शक्यता खूप धुसर दिसत होती.

मिडविकेटला खणखणीत चौकार सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या कानिटकरांनी मुश्ताकच्या पाचव्या चेंडूवर मिडविकेटला खणखणीत चौकार मारला आणि रातोरात स्टार बनले. कानिटकर या सामन्यात 11 धावांवर नाबाद राहिले. कानिटकरांनी 1997 साली भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यांनी दोन कसोटी आणि 34 वनडेमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आजही सकलेन मुश्ताकला ठोकलेल्या चौकारासाठी त्यांची आठवण काढली जाते.

मुंबई विरुद्ध कानिटकरांनी केलं पदार्पण 1994-95 साली सोलापूरच्या इंदिर गांधी स्टेडियममध्ये त्यांनी संजय मांजरेकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई संघाविरुद्ध रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो सामना ड्रॉ झाला होता. मूळचे पुणेकर असलेले हृषिकेश कानिटकर महाराष्ट्राकडून रणजी क्रिकेट खेळले आहेत. याच स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर त्यांची भारतीय संघात निवड झाली होती. ते इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटही खेळले आहेत. रणजी करंडक स्पर्धेत 8000 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या तीन फलंदाजांमध्ये त्यांचा समावेश होतो. डावखुरी फलंदाजी करणारे कानिटकर ऑफ-ब्रेक गोलंदाजी करायचे.

प्रथम श्रेणीत 10,400 धावा केल्या हृषिकेश कानिटकर यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभाळली आहे. 2011 मध्ये त्यांची कोची टस्कर्सच्या सहाय्यक कोचपदी निवड झाली होती. मालकासोबत वाद झाल्याने सीजन सुरु होण्यापूर्वीच ते जबाबदारीतून मुक्त झाले. 2015-16 ते गोवा संघाचे हेड कोच बनले. 2016 ते 2019 पर्यंत ते तामिळनाडू क्रिकेट संघाचे हेड कोच होते. त्यावेळी तामिळनाडू संघाची बांधणी करण्याचे श्रेय त्यांना जाते. प्रथम श्रेणीच्या 146 सामन्यांमध्ये त्यांनी 10,400 धावा केल्या. 2015 मध्ये कानिटकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले. त्यांचे वडिल हेमंत कानिटकर सुद्धा भारतीय संघातून खेळले आहेत.

who is indias under 19 world cup winning coach hrishikesh kanitkar famous for boundary against pakistan

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.