Who is Liam Livingstone: लाखाच्या खेळाडूसाठी म्हणून पंजाब किंग्सने 11.50 कोटी मोजले, CSK वर पडला भारी

Who is Liam Livingstone: आज पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) लियाम लिविंगस्टोनचा (Liam Livingstone) दिवस आहे. पावरप्लेच्या षटकामध्ये त्याने आपल्या बॅटचा चांगलाच हिसका दाखवला.

Who is Liam Livingstone: लाखाच्या खेळाडूसाठी म्हणून पंजाब किंग्सने 11.50 कोटी मोजले, CSK वर पडला भारी
ipl 2022 : लियाम लिविंगस्टोन पंजाब किंग्स Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 8:56 PM

मुंबई: आज पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) लियाम लिविंगस्टोनचा (Liam Livingstone) दिवस आहे. पावरप्लेच्या षटकामध्ये त्याने आपल्या बॅटचा चांगलाच हिसका दाखवला. चेन्नई सुपर किंग्सच्या मुकेश चौधरीच्या (CSK Mukesh Choudhary) एका ओव्हरमध्ये त्याने 26 धावा लुटल्या. पंजाब किंग्सची दोन बाद 14 अशी स्थिती असताना लिविंगस्टोन फलंदाजीसाठी मैदानात आला. याआधी झालेल्या दोन सामन्यातही पंजाब किंग्सच्या या फलंदाजाने लक्ष वेधून घेतलं होतं. आज तर लिविंगस्टोनने मैदानावर पावर हिटिंगचा शो दाखवला. त्याच्या बॅटमधून निघणारे चौकार-षटकार थक्क करुन सोडणारे होते. मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर त्याने एक 108 मीटर लांब सिक्स मारला. काही फलंदाज मैदानात आल्यानंतर क्रिकेट मध्ये डिफेन्स नावाचा प्रकार आहे, हे त्यांना माहित आहे का? असा प्रश्न पडतो. लियाम लिविंगस्टोनची फलंदाजी बघून त्याच गोष्टीची आठवण झाली.

त्याने CSK ला बॅकफूटवर ढकललं

टी 20 क्रिकेटमध्ये विकेट गेल्यानंतरही डिफेन्स करताना धावगती मंदावणार नाही याची काळजी घ्यावी लागते. लिविंगस्टोन सारखा फलंदाज कुठल्याही क्षणी सामन्याचं चित्र बदलू शकतो. आज तेच दिसून आले. एकाच षटकात त्याने 26 धावा फटकावून चेन्नई सुपर किंग्सच्या टीमला बॅकफूटवर ढकललं.

कोण आहे लियाम लिविंगस्टोन?

लियाम लिविंगस्टोन हा मूळचा इंग्लिश क्रिकेटपटू आहे. मागच्या महिन्यात झालेल्या आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सने 11.50 कोटी रुपये मोजून त्याला विकत घेतलं होतं. पंजाब, कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद या तीन संघांमध्ये लिविंगस्टोनला खरेदी करण्यासाठी बीडिंग वॉर पहायला मिळाल. अखेर पंजाब किंग्सने 11.50 कोटीची बोली लावून बाजी मारली. खरंतर लियाम लिविंगस्टोनच हे पहिल आयपीएल नाहीय. याआधी 2019 आणि 2021 मध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळलाय. त्यावेळी त्याच्यासाठी अनुक्रमे 50 लाख आणि 75 लाख रुपये मोजले होते. पण यंदा त्याच्यासाठी इतकी मोठी रक्कम मोजल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

…म्हणून पंजाबने इतके पैसे मोजले

पंजाबने या पॉवर हिटरसाठी इतके पैसे का मोजले ? ते आज त्याची फलंदाजी पाहून लक्षात येतय. आयपीएल 2022 आधी दोन सीजनमध्ये लिविंगस्टोन फक्त नऊ सामने खेळला होता. त्यात त्याने 113 धावा केल्या होत्या. लिविंगस्टोन बिग हिटर आहे. त्याशिवाय तो लेग स्पिन गोलंदाजीही करतो. हिटिंग करण्याच्या क्षमतेमुळेच पंजाब किंग्सने त्याच्यासाठी इतकी रक्कम मोजली. आज त्याने 32 चेंडूत 60 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि पाच षटकार होते.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.