LSG vs MI IPL 2023 : CSK विरुद्ध 3 ओव्हरमध्ये 42 धावा लुटवणारा बॉलर लास्ट ओव्हरमध्ये ठरला मुंबई विरुद्ध विजयाचा हिरो

LSG vs MI IPL 2023 : पुनरागमन करताना या बॉलरला चांगलाच मार पडलेला. दुखापतीमुळे 1 वर्ष तो टीमच्या बाहेर होता. पण काल त्याने लास्ट ओव्हरमध्ये कमाल केली. त्याच्या वडिलांना सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

LSG vs MI IPL 2023 : CSK विरुद्ध 3 ओव्हरमध्ये 42 धावा लुटवणारा बॉलर लास्ट ओव्हरमध्ये ठरला मुंबई विरुद्ध विजयाचा हिरो
LSG vs MI IPL 2023Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 8:09 AM

लखनऊ : समोर लांबलचक शॉट्स मारणारे बॅट्समन असतील, तर लास्ट ओव्हरमध्ये 11 धावांचा बचाव करणं सोपं नसतं. खासकरुन त्या बॉलरने शेवटच्या सामन्यात खराब गोलंदाजी केली असेल, तर नक्कीच सोपं नसतं. एक वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या गोलंदाजासाठी ते मोठं टास्क असतं. लखनऊ सुपर जायंट्सचा बॉलर मोहसीन खानने ते टास्क पूर्ण केलं. मोहसीन खानने मंगळवारी लास्ट ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला 11 धावा करु दिल्या नाहीत. लखनऊने 5 रन्सनी विजय मिळवला.

मुंबई इंडियन्सचे दोन आक्रमक फलंदाज पीचवर असताना मोहसीन खानने ही कमाल केली. हे दोन्ही फलंदाज सहज सीमारेषेपार चेंडू पोहोचवू शकतात. टिम डेविड आणि कॅमरुन ग्रीन काल लास्ट ओव्हरमध्ये क्रीजवर होते. डेविड जबरदस्त बॅटिगं करत होता. ग्रीनमध्ये सुद्धा दोन सिक्स मारण्याची क्षमता आहे. पण मोहसीनसमोर हे दोघेही फेल ठरले.

मुंबईच्या पराभवाला कोण जबाबदार?

लास्ट ओव्हरमध्ये मुंबईला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता होती. पण मोहसीनने फक्त 5 धावा दिल्या. त्याने पहिल्या चेंडूवर ग्रीनला एकही धाव घेऊ दिली नाही. दुसऱ्या चेंडूवर ग्रीनने एक रन्स काढला. पुढच्या चेंडूवर टीम डेविडने फक्त एक रन्स काढला. चौथ्या चेंडूवर ग्रीनला एकही धाव काढता आली नाही. पाचव्या चेंडूवर ग्रीनने फक्त एक रन्स काढला. त्यामुळे लखनऊचा विजय पक्का झाला.

लास्ट बॉल टाकताना काय जबाबदारी ?

एकही नो बॉल पडणार नाही, ही जबाबदारी मोहसीनची होती. मोहसीनने लास्ट बॉलवर काही चुकीच केलं नाही. फक्त 2 रन्स देऊन लखनऊचा विजय निश्चित केला.

एक वर्षानंतर पुनरागमन

मोहसीनने मागच्यावर्षीच आयपीएलमध्ये डेब्यु केला होता. लखनऊकडून खेळताना टीमला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. मागच्या सीजनमध्ये त्याने 9 सामन्यात 14 विकेट काढल्या होत्या. मागचा सीजन संपल्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. कारण त्याला दुखापत झाली होती. त्याच्या खांद्याला दुखापत झालेली. त्यासाठी त्याची शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. यावर्षी आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये तो सुरुवातीचे सामने खेळला नाही.

अपयशाला सोडलं मागे

चालू सीजनमध्ये 3 मे रोजी तो चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळला. पण या मॅचमध्ये त्याने गोलंदाजी केली नाही. गुजरात टायटन्स विरुद्ध 7 मे रोजी त्याला पुन्हा संधी मिळाली. या सामन्यात त्याने 3 ओव्हरमध्ये 42 धावा देत 1 विकेट काढला. म्हणजे त्याचं प्रदर्शन चांगलं नव्हतं. काल मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याने अपयशाला मागे सोडत दमदार कामगिरी केली. तो लखनऊच्या विजयाचा हिरो ठरला. काय होत्या कौटुंबिक अडचणी?

मोहसीन फक्त आपल्या दुखापतीचा सामना करत नव्हता, तर कौटुंबिक अडचणी सुद्धा होत्या. त्याचे वडिल मागच्या 10 दिवसापासून रुग्णालयात दाखल होते. सोमवारीच ते रुग्णालयातून घरी परतले. मोहसीनला आपल्या वडिलांच्या तब्येतीची काळजी होती. आता त्याच्या परफॉर्मन्सवर वडिल सुद्धा आनंदी असतील.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.