लॉर्ड ठाकूरला क्लीन बोल्ड करणारी मिताली परुळकर काय करते?

या सोहळ्याला भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा, मुंबई रणजी संघातील वरिष्ठ खेळाडू धवल कुलकर्णी, अभिषेक नायर आणि शार्दुल ठाकूरचे अनेक जुने मित्र उपस्थित होते.

लॉर्ड ठाकूरला क्लीन बोल्ड करणारी मिताली परुळकर काय करते?
Shardul Thakur - Mitali Parulkar
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 6:11 PM

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur Engagement) एंगेजमेंट केली आहे. जगभरात ‘लॉर्ड’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या मुंबईकर खेळाडूचा आज (29 नोव्हेंबर) त्याची मैत्रीण मिताली परुळकरसोबत साखरपुडा संपन्न झाला. दोघांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मुंबईत पार पडला. वांद्रे-कुर्ला संकुलात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या सोहळ्याला भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा, मुंबई रणजी संघातील वरिष्ठ खेळाडू धवल कुलकर्णी, अभिषेक नायर आणि शार्दुल ठाकूरचे अनेक जुने मित्र उपस्थित होते. (Who is Shardul Thakur’s future wife, what does Mitali Parulkar do?)

या समारंभासाठी केवळ 75 लोकांना आमंत्रित केले होते, ज्यात कुटुंबातील सदस्य आणि दोघांचेही मित्र उपस्थित होते. एंगेजमेंटनंतर जवळपास एक वर्षानंतर शार्दुल ठाकूर आणि मिताली परुळकर लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर दोघेही लग्नबंधनात अडकू शकतात.

मिताली परुळकर ठाण्यात ऑल द बेक्स नावाची स्टार्टअप कंपनी चालवते. शार्दुल ठाकूरने 2021 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान शेवटचा सामना खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली आहे आणि तो टी-20 मालिकेचाही भाग नव्हता.

30 वर्षीय शार्दुल ठाकूर टीम इंडियाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला होता. तो सध्या ब्रेकवर आहे. त्याने आतापर्यंत चार कसोटी, 15 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तो नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता. यापूर्वी आयपीएल 2021 मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. अलीकडच्या काळात शार्दुल तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळत आहे. कसोटीत त्याने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यावर त्याने अर्धशतके झळकावली होती. त्यामुळे त्याचे खूप कौतुक झाले.

शार्दुलची कारकीर्द

शार्दुल ठाकूर हा मूळचा मुंबईजवळच्या पालघर या उपनगरातला रहिवासी आहे. 2017 मध्ये त्याने टीम इंडियामध्ये पदार्पण केले. तर 2018 मध्ये त्याचे कसोटी पदार्पण झाले. त्याने आतापर्यंत कसोटीत 14, वनडेत 22 आणि टी-20 मध्ये 31 बळी घेतले आहेत. शार्दुल ठाकूर आणि रोहित शर्मा यांनी एकत्र अनेकदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दोघांनीही खेळातील बारकावे एकच प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याकडून शिकून घेतले आहेत. शालेय जीवनात त्याने सहा चेंडूंत सहा षटकार ठोकण्याचा पराक्रमही केला होता.

पुढे मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत त्याने टीम इंडियात स्थान मिळवले. मुंबईला रणजी चॅम्पियन बनवण्यातही त्याचा महत्त्वाचा वाटा होता. आयपीएलमध्ये त्याचे पदार्पण पंजाब किंग्जकडून झाले होते. पण नंतर चेन्नई सुपर किंग्जमध्ये येऊन त्याला यश मिळाले. 2018 आणि 2021 आयपीएलचे विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई संघाचा तो भाग होता. तसेच यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने चेन्नईकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

व्हिडीओ पाहा

इतर बातम्या

प्रेयसीसोबत अनेक वर्षांची ‘पार्टनरशिप’, मुंबईकर ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूरचा साखरपुडा

IND vs NZ : टीम इंडिया धर्मसंकटात, विराट कोहलीसाठी कोणता फलंदाज बलिदान देणार?

‘माझी भारतीय संघात निवड करु नका’; हार्दिक पंड्याची निवड समितीला विनंती

(Who is Shardul Thakur’s future wife, what does Mitali Parulkar do?)

गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.