ठरलं! भारतीय संघाचे फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी कोच कोण होणार?

राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर यांना टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत सहाय्यक कोच म्हणून देखील काही जणांची निवड केली जाणार आहे. जाणून घ्या या पदांसाठी कोणाची नावे चर्चेत आहेत.

ठरलं! भारतीय संघाचे फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी कोच कोण होणार?
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 3:52 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 T20 आणि 3 ODI सामन्यांची मालिका होणार आहे. जी 27 जुलैपासून सुरू होत आहे. टीम इंडिया नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागी आता गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे. T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामना जिंकत टीम इंडियाने इतिहास रचला. आता गौतम गंभीरप पुढे चॅम्पियन ट्रॉफी आणि टी20 वर्ल्डकप 2026 जिंकण्याचा मानस असेल. बीसीसीआयने यासाठी जबाबदारी गौतम गंभीरकडे सोपवली आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासोबतच फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाचाही कार्यकाळही संपलाय. त्यामुळे आता या तीन जबाबदाऱ्या कोणाला मिळतात याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे. गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाफमध्ये कोण कोण असणार याबाबत चर्चा सुरु आहे. पण आता चित्र जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे.

भारतीय संघ सोमवारी दुपारी 1 वाजता मुंबईहून चार्टर विमानाने श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्याआधी बीसीसीआय गौतम गंभीरला नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून औपचारिकपणे घोषित करेल. त्यासाठी 22 जुलै रोजी मुंबईतील अंधेरी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेला कर्णधार रोहित शर्मा आणि टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी कोणाचे नाव चर्चेत

टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असलेल्या टी दिलीप यांचा कार्यकाळ पुन्हा वाढवला जाऊ शकतो. कारण टी दिलीप यांनी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून आपली चांगली प्रतिष्ठा निर्माण केली आहे. ड्रेसिंग रूममध्ये त्यांचे खेळाडूंसोबत चांगले नाते निर्माण झाले आहे. त्यामुळेच टी दिलीप टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कायम राहणार असल्याचं बोललं जात आहे. ते देखील टीम इंडियासोबत कोलंबोला रवाना होणार आहेत.

गोलंदाजी प्रशिक्षकामध्ये कोणाचे नाव पुढे आहे?

नवीन गोलंदाजी प्रशिक्षक कोण असेल हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मॉर्नी मॉर्केलचे नाव आघाडीवर आहे. येत्या 1 ते 2 दिवसांत त्याची घोषणा होईल. मॉर्नी मॉर्केलने गौतम गंभीरसोबत लखनौ सुपर जायंट्स संघात २ वर्षे काम केले आहे. त्याच्याआधी जहीर खान आणि एल बालाजी यांचं नाव देखील चर्चेत होतं.

;

सहाय्यक प्रशिक्षक कोण होणार

क्रिकबझच्या वृत्तानुसार, अभिषेक नायर आणि रायन टेन डोशेट या दोघांना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे सहाय्यक म्हणून ठेवले जाईल. अभिषेक नायर हा गौतम गंभीरचा विश्वासू साथीदार मानला जातो. गौतम गंभीर व्यतिरिक्त अभिषेक नायर हा देखील आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सच्या यशाचा मुख्य आधार राहिला आहे. वरुण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर या खेळाडूंनी गेल्या मोसमात नाइट रायडर्सच्या विजेतेपदाचे श्रेय अभिषेक नायरला दिले होते.

या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.