Virat Kohli Test Captaincy: रोहित, राहुल की ऋषभ पंत?, कर्णधारपदासाठी बेस्ट कोण?; चर्चा तर होणारच!
विराट कोहलीने अचानक कसोटीचं कर्णधारपद सोडल्यानंतर कसोटीचा आगामी कर्णधार कोण? असा सवाल केला जात आहे. रोहित शर्मा, केएल राहुल की इतर कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नवी दिल्ली: विराट कोहलीने अचानक कसोटीचं कर्णधारपद सोडल्यानंतर कसोटीचा आगामी कर्णधार कोण? असा सवाल केला जात आहे. रोहित शर्मा, केएल राहुल की इतर कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वन डे असो की कसोटी विराटची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. त्यामुळे नवा कर्णधार निवडण्याचं बीसीसीआयसमोर संकट निर्माण झालं आहे.
अनिल कुंबळे, महेंद्र सिंह धोनी आणि आता विराट कोहली यांनी कर्णधारपद सोडल्यानंतर ज्याच्यावर कर्णधारपद दीर्घकाळासाठी सोडावं असा एकही खेळाडू भारतीय संघात नाहीये. कसोटी कर्णधारपदासाठी टीम इंडियात अनेक खेळाडू रेसमध्ये आहेत. मात्र, कर्णधार निवडताना निवड समितीला अन्य गोष्टींचाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे कर्णधारपदाच्या रेसमधील खेळाडूंच्या जमेच्या बाजू आणि मर्यादांवर टाकलेला हा प्रकाश.
रोहिती शर्मा: रोहित शर्मा टी-20 आणि वनडेचा कर्णधार होता. तो कसोटी टीमचाही उपकर्णधार आहे. संकेतांचा विचार केला तर कर्णधारानंतर उपकर्णधाराकडे सर्व जबाबदारी जाते. त्यामुळे रोहित शर्मा कर्णधार होण्याची चान्सेस अधिक आहेत. गेल्या दोन वर्षात रोहितने टेस्ट खेळाडू म्हणून स्वत:मध्ये अनेक बदलही घडवून आणले आहेत.
विराटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या काळातच कर्णधारपद सोडल्याने रोहितकडे कर्णधारपद जाण्याची शक्यता अधिक आहे. तसं झाल्यास विराटप्रमाणेच रोहितही तीन फॉर्मेटमधील कर्णधार बनेल. मात्र, रोहितची सर्वात मोठी अडचण म्हणजे तो 34 वर्षाचा असून त्याच्या फिटनेसचा इश्यू आहे. फिटनेसच्या कारणामुळेच मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो सुरुवातीपासून गेला नव्हता. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरही जाऊ शकला नव्हता.
केएल राहुल: केएल राहुल 30 वर्षाचा आहे. त्यामुळे त्याच्याकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. टी-20 वनडेमध्ये त्याला रोहित शर्माचा डेप्युटी बनवण्यात आलं होतं. कसोटी सामन्यातही विराट आणि रोहितच्या गैरहजेरीत राहुलकडेच कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. वय आणि अनुभवी खेळाडू म्हणून केएल राहुलकडे कर्णधारपद जाण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे.
कर्णधार म्हणून राहुलचा अनुभव कमी आहे. आयपीएलमध्ये त्याने पंजाबच्या संघाचं कर्णधारपद भूषवलं होतं. मात्र, तो खास चमत्कार करू शकला नव्हता. कसोटीतही सलामीचा फलंदाज म्हणून त्याने नुकतेच स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून त्याच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. त्याचा सामना करणं टीमला कठिण जाऊ शकतं, असं सूत्रांनी सांगितलं.
रविचंद्रन अश्विन: टीम इंडियातील ज्येष्ठ खेळाडू रविंचद्रन अश्विनही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. राहुल द्रविडने कर्णधारपद सोडल्यानंतर तातडीने कर्णधार नियुक्त करण्याची आवश्यकता होती. तेव्हा अनिल कुंबळेला कर्णधारपद देण्यात आलं होतं. त्याच्या नेतृत्वातील संघाने चांगली कामगिरीही केली होती. असंच रविचंद्रन अश्विनबाबतही होऊ शकतं.
रविचंद्रन अश्विन हा पूर्णविचार करूनच गोलंदाजी करत असतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना तो तर्कही देतो. पूर्ण नियोजन करून तो पुढे पुढे सरकत असतो. मात्र, रोहितप्रमाणेच वय आणि फिटनेसचा इश्यू ही अश्विनची कमजोरी आहे. तसेच आंतरराष्ट्रीय खेळपट्ट्यांवरील त्याचं रेकॉर्ड विशेष चांगलं नाही. त्याच्याकडे कर्णधारपद दिलं तर संघात दुसरा स्पिनर घेणं निवड समितीला कठिण होऊन बसेल.
ऋषभ पंत: कर्णधारपदाच्या चर्चेत ऋषभ पंतचंही नाव आलं आहे. खुद्द माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि युवराज सिंग यांनी ऋषभचं नाव कर्णधारपदासाठी सूचवलं आहे. ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिल्यास त्याचा खेळ सुधारेल. तसेच तो संघात दीर्घकाळ टिकून राहील, असं गावस्कर यांचं म्हणणं आहे. तर ऋषभ खेळाला चांगल्या पद्धतीने समजून घेतो, असं युवराज सिंगने म्हटलं आहे.
ऋषभ पंत 24 वर्षाचा आहे. त्यामुळे त्याला आतापासूनच कर्णधारपद मिळणं कठिण आहे. आयपीएलमध्ये दिल्लीचं कर्णधारपद त्याच्याकडे होतं. त्याच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये दिल्लीने चांगली कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरोधातील शेवटच्या डावात ऋषभने शतकी खेळी केली. मात्र, त्यापूर्वी त्याचा फॉर्म खराब होता. मात्र, गेल्या दोन वर्षात खेळाडू म्हणून त्याच्या खेळात प्रचंड सुधारणा झालेली आहे.
जसप्रीत बुमराह: भारतीय क्रिकेट संघात क्वचितच गोलंदाजाकडे कर्णधारपद गेलं आहे. मात्र, आफ्रिकेविरोधातील सीरिजमध्ये दुसऱ्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहला उप कर्णधार बनवलं होतं. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. गेल्या चार पाच वर्षापासून बुमराह टीम इंडियात आहे. त्यामुळे त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवलं गेलं असावं. मात्र, देशांतर्गत क्रिकेट सामन्यात बुमराहला नेहमीच संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे.
बुमराहने आंतरराष्ट्रीय खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी केली आहे. तर देशांतर्गत सामन्यात स्पिनर्सचा बोलबाला राहिला आहे. त्यामुळे त्याला सातत्याने संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. गोलंदाजांना अशा प्रकारच्या विश्रांतीची गरजही असते. त्यामुळे अशा परिस्थितीत बुमराहकडे कर्णधारपद जाणार का? असा सवाल केला जात आहे.
Virat Kohli : विराटने कर्णधारपद सोडण्यापूर्वी नेमकं काय घडलं?, बीसीसीआयशी चर्चा केली होती का?; तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवरhttps://t.co/MQew0D4IDJ#ViratKohli | #BCCI | #Virat | #ViratKohliResigns
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 16, 2022
संबंधित बातम्या:
Virat Kohli Test Captaincy: कर्णधारपद सोडताच विराटवर टांगती तलवार, कसोटी संघात स्थान टिकणार का?