टी20 संघाचं नेतृत्व कोण करणार? हार्दिक पांड्या की सूर्यकुमार यादव! शर्यतीत कोण आघाडीवर? जाणून घ्या

भारतीय संघ तीन टी20 सामने आणि 3 वनडे सामन्यांसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. पण या मालिकेपूर्वी कर्णधारपदावरून बरंच काही सुरु आहे. त्यामुळे संघ घोषित करण्यासही उशीर होताना दिसत आहे. दहा दिवस शिल्लक असूनही संघाची घोषणा झालेली नाही. त्यात टी20 संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादव की हार्दिक पांड्याकडे असेल याबाबत खलबतं सुरु आहे.

टी20 संघाचं नेतृत्व कोण करणार? हार्दिक पांड्या की सूर्यकुमार यादव! शर्यतीत कोण आघाडीवर? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 9:04 PM

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर रोहित शर्माने या फॉर्मेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे या संघाचं कर्णधारपद कोण भूषविणार याची चर्चा रंगली आहे. असं असताना कर्णधारपदाच्या शर्यतीत दोन नावं आघाडीवर आहेत. यात सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे नाव चर्चेत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद होतं. त्यामुळे त्याच्याकडेच सूत्र सोपवली जातील अशी चर्चा होती. मात्र आता सूर्यकुमार यादवचं नाव आघाडीवर आलं आहे. 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार आहे. त्यासाठी या दोन वर्षात भक्कम नेतृत्वाच्या शोधात प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती आहे. 2026 वर्ल्डकपच्या दृष्टीने सूर्यकुमार यादव हे सर्वात जास्त पसंतीस उतरल्याचं सांगितलं जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत हार्दिक पांड्या असणार आहे. मात्र असं असूनही सूर्यकुमारच्या हाती नेतृत्व सोपवलं गेलं तर हा 2026 वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय असेल. दुसरीकडे, वैयक्तिक कारणामुळे हार्दिक पांड्याने वनडे मालिकेतून माघार घेतली आहे.

सूर्यकुमार यादवने मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अप्रिकेविरुद्धच्या 8 सामन्यात टी20 संघाचं नेतृत्व केलं आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर याचीही त्याच्या नावाला पसंती असल्याचं दिसत आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआयला माहिती देताना सांगितलं की, “रोहित शर्माच्या नेतृत्वात हार्दिक पांड्या टी20 संघाचा उपकर्णधार होता. तो पूर्णपणे फीट असून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी उपलब्ध आहे. तो संघाचं नेतृत्व करेल असं सांगण्यात येत होतं. पण आता सूर्यकुमार यादवच्या नावाचा विचार केला जात आहे. त्याचा नावाचा फक्त श्रीलंका नाही तर 2026 वर्ल्डकपच्या दृष्टीने विचार होत आहे.”

33 वर्षीय सूर्यकुमार यादव हा भारतीय संघातील सर्वात लोकप्रिय खेळाडू मानला जातो. सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सपासून नावलौकिक मिळवला. गौतम गंभीरच्या नेतृत्वात त्याला स्काय ही उपाधी देखील मिळाली. सूर्यकुमार यादवने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 68 सामन्यातील 65 डावात त्याने 2340 धावा केल्या आहेत. 117 ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. धावांच्या बाबतीत सूर्यकुमार यादव पांड्याच्या खूपच पुढे आहे. पण अष्टपैलू खेळाडू म्हमून हार्दिक पांड्याचा हात कोणी धरू शकत नाही.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.