KKR vs PBKS, IPL 2022 Match Prediction: स्फोटक फलंदाज ओडियन स्मिथ KKR वर भारी पडणार? आजची मॅच कोण जिंकणार?
KKR vs PBKS, IPL 2022 Match Prediction: कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्समध्ये (KKR vs PBKS) आयपीएल 2022 (IPL 2022) चा आठवा सामना होणार आहे.
मुंबई: कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्समध्ये (KKR vs PBKS) आयपीएल 2022 (IPL 2022) चा आठवा सामना होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात सलग दुसऱ्या विजयावर पंजाब किंग्सची नजर आहे. या सामन्यात कोलकात्याचा संघ आरसीबी विरुद्ध केलेल्या चूका सुधारण्याचा प्रयत्न करेल. मागच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) तीन विकेट राखून पराभव केला होता. कोलकात्याने कमी धावसंख्या उभारुनही बँगलोरला विजयासाठी झुंजवले होते. शेवटच्या षटकापर्यंत सामन्यात रंगत टिकून होती. पंजाब किंग्स संघाल आपल्या गोलंदाजांकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. कारण सलामीच्या सामन्यात त्यांनी 200 पेक्षा जास्त धावा दिल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने तीन दिवसांचा क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केलाय. त्यामुळे पंजाबच्या गोलंदाजी आक्रमणाची धार वाढू शकते.
वानखेडेवर आतापर्यंत दोन सामने खेळले गेलेत. दोन महिने चालणाऱ्या आयपीएलची ही सुरुवात आहे. टॉस सामन्याच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावतोय. दुसऱ्या डावात दवाचा प्रभाव पडतोय.
KKR च्या फलंदाजांना कामगिरी उंचावावी लागेल
कोलकाताचे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि आक्रमक डावखुरा फलंदाज वेंकटेश अय्यर RCB विरुद्धच्या सामन्यात स्वस्तात बाद झाले होते. पुढच्या सामन्यात संघाला दमदार सुरुवात देण्याचा दोघांचा प्रयत्न असेल. कॅप्टन श्रेयस अय्यर आरसीबी विरुद्ध अपयशी ठरला असला, तरी तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नीतिश राणा सारख्या अन्य सहकाऱ्यांची बॅट तळपणं, सुद्धा तितकचं गरजेचं आहे. या दोघांशिवाय सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन आणि बिग हिटर आंद्रे रसेल यांच्यावर मधल्याफळीत महत्त्वाची जबाबदारी असेल. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीची लय बिघडवण्याची क्षमता असलेले फलंदाज केकेआरकडे आहेत. पंजाब किंग्स विरुद्ध हे सर्व एकजुटीने प्रदर्शन करतील, अशी टीम मॅनेजमेंटला अपेक्षा आहे.
गोलंदाजी बद्दल बोलायचे झाल्यास, उमेश यादवने पहिल्या दोन सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. टिमचा वेगवान गोलंदाज टिम साउदीला सुद्दा महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. वरुण चक्रवर्तीचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे.
पंजाबकडे पॉवर हिटर फलंदाज
टॉप ऑर्डरमधील पहिल्या तीन फलंदाजांवर पंजाब किंग्स जास्त अवलंबून आहे. कॅप्टन मयंक अग्रवाल, शिखर धवन आणि श्रीलंकेच्या भानुका राजपक्षेकडून टीमला बऱ्याच अपेक्षा आहेत. ओडियन स्मिथ आणि शाहरुख खानने आरसीबी विरुद्ध विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अंडर 19 वर्ल्ड कपचा स्टार राज बावाला आणखी एक संधी मिळते का नाही ? ते पहावे लागेल. कारण डेब्यूमध्ये तो अपयशी ठरला होता. पंजाबचा गोलंदाज संदीप शर्मा, अर्शदीप सिंह आणि ओडियन स्मिथला केकेआर विरुद्धच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल.
KKR vs PBKS, IPL 2022 Prediction
कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्समध्ये आतापर्यंत 29 सामने झालेत. यात केकेआरची बाजू वरचढ आहे. कोलकाता नाइट रायडर्सने 19 तर पंजाब किंग्सने 10 सामने जिंकले आहेत. मागच्या सीजनमध्ये कोलकाताने पंजाबला पाच विकेटने हरवलं होतं. त्यानंतर पुढच्या सामन्यात पंजाबने पाच विकेटने सामना जिकंला होता. 2020 मध्येही दोन्ही संघ प्रत्येकी 1-1 सामना जिंकेल होते.