MI vs PBKS, IPL 2021 Match Prediction: मुंबई विरुद्ध पंजाब, दोघांसाठी करो या मरो! अबू धाबीत हायव्होल्टेज सामना
आयपीएलचे विजेतेपद सर्वाधिक वेळा जिंकणारा मुंबई इंडियन्स हा संघ यंदा खेळाडूंच्या खराब फॉर्मशी झगडतोय. आयपीएल 2021 मध्ये या चॅम्पियन संघाची स्थिती सध्या सर्वात वाईट आहे.
मुंबई : आयपीएलचे विजेतेपद सर्वाधिक वेळा जिंकणारा मुंबई इंडियन्स हा संघ यंदा खेळाडूंच्या खराब फॉर्मशी झगडतोय. आयपीएल 2021 मध्ये या चॅम्पियन संघाची स्थिती सध्या सर्वात वाईट आहे. मुंबईचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर उभा आहे. (Who will win MI vs PBKS IPL match Prediction, Big fight between Rohit Sharma and KL Rahul team)
आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात रोहित शर्माचा हा संघ आज आपला तिसरा सामना खेळणार आहे, ज्यामध्ये मुंबईचा सामना केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्जशी होणार आहे. राहुलच्या संघाचाही हा तिसरा सामना आहे. पण या दोन संघांमधला मोठा फरक असा आहे की, पंजाब किंग्सने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील मागील 2 सामन्यांपैकी एक जिंकला आहे, तर मुंबई इंडियन्स अद्याप त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. विजयाचा हा शोध आजही संपला नाही, तर मुंबई इंडियन्सचा प्ले-ऑफचा मार्ग जवळपास बंद होईल.
प्लेऑफकडे वाटचाल करण्यासाठी हा सामना जिंकणं पंजाबसाठीदेखील अत्यंत गरजेचं आहे. मुंबई आणि पंजाब हे दोन्ही संघ सध्या 8 गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे आज अबू धाबीच्या मैदानात हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.
रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्ससाठी अजून एक वाईट गोष्ट म्हणजे आयपीएल 2021 मध्ये खेळलेल्या शेवटच्या सामन्यात पंजाबचा संघ मुंबईविरोधात विजयी झाला होता. त्यामुळे दबाव पूर्णपणे मुंबई आणि रोहितवरच असणार आहे. मागील 5 सामन्यांच्या रिपोर्ट कार्डमध्येही पंजाब किंग्जचा मुंबईवर 3-2 असा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत अनेकदा कांटे की टक्कर पाहायला मिळाली आहे.
मुंबई आणि पंजाब हे दोन संघ आयपीएलच्या इतिहासाात आतापर्यंत 27 वेळा एमकेकांसमोर उभे ठाकले आहेत. या 27 पैकी 13 सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे, तर 14 सामने मुंबईने जिंकले आहेत. आजचा सामना अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मैदानात उभय संघांमध्ये गेल्या वर्षी एक सामना खेळवण्यात आला होता, या सामन्यात मुंबईने पंजाबला धूळ चारली होती.
अबू धाबीत कांटे की टक्कर
आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्समध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. तर पंजाब किंग्ज त्यांच्या सवयीनुसार आजही प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करताना दिसेल. आज पंजाबला टक्कर देण्यासाठी या संघातील भारतीय फलंदाजांची बॅट तळपणे आवश्यक आहे, जे अद्याप घडलेले दिसत नाही. इशान किशन, सूर्यकुमार यादव मधल्या षटकात फ्लॉप ठरले आहेत. मुंबईची गोलंदाजी अजूनही त्यांची मजबूत बाजू आहे. दुसरीकडे पंजाब किंग्ज संघाची फलंदाजी मजबूत आहे. संघाची सर्वात मोठी ताकद केएल राहुल आणि मयंक अग्रवाल ही सलामीची जोडी आहे. याशिवाय पंजाबची गोलंदाजीही प्रभावी आहे.
इतर बातम्या
IPL 2021: बलाढ्य सीएसके संघाची कमकुवत बाजू कोणती?, वीरेंद्र सेहवागने सांगितली आतली माहिती
(Who will win MI vs PBKS IPL match Prediction, Big fight between Rohit Sharma and KL Rahul team)