RCB vs GT IPL 2022 Match Prediction: गुजरात टायटन्स बँगलोरचं प्लेऑफच स्वप्न उधळून लावणार?
एक जबरदस्त इनिंग विराट बद्दलच्या सर्व चर्चांना पूर्ण विराम देऊ शकते. कॅप्टन फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिकलाही आपल्या प्रदर्शनाचा स्तर उंचावावा लागेल.
मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी इंडियन प्रिमीयर लीगच्या 15 व्या सीजनमध्ये प्लेऑफचा मार्ग सोपा नाहीय. RCB ला खूप मेहनत करावी लागेल. त्यांचा आता फक्त एक सामना शिल्लक असून त्यांचे जास्तीत जास्त 16 पॉइंट्स (Points Table) होऊ शकतात. उद्या गुरुवारी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धचा सामना जिंकला, तरच हे घडू शकतं. गुजरात टायटन्स हा सामना जिंकून आपलं पहिलं स्थान अजून बळकट करण्याचा प्रयत्न करेल. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरातने 13 सामन्यात 20 गुण मिळवले आहेत. आरसीबीने सात सामने जिंकले असून सहा सामने गमावले आहेत. 13 सामन्यात 14 गुणांसह ते पाचव्या स्थानावर आहेत. आरसीबीचा नेट रनरेट -०.323 आहे. गुजरात विरुद्ध विजय मिळवल्यास त्यांचे 16 पॉइंटस होतील. पण दुसरे निकाल अनुकूल येण्यासाठी प्रार्थना करावी लागेल. दिल्ली कॅपिटल्स सध्या चौथ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सला नमवून ते सुद्धा 16 पॉइंटस पर्यंत पोहोचू शकतात. त्यांचा नेट रनरेट आरसीबीपेक्षा चांगला +0.255 आहे.
एक इनिंग विराट बद्दलची सर्व चर्चा थांबवेल
सलग दोन सामने जिंकून आरसीबीची टीम विजयी मार्गावर परतली होती. पण पंजाब किंग्स विरुद्ध त्यांचा 54 धावांनी पराभव झाला. विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम आहे. तो मागच्या सामन्यात 20 रन्सवर आऊट झाला. एक जबरदस्त इनिंग विराट बद्दलच्या सर्व चर्चांना पूर्ण विराम देऊ शकते. कॅप्टन फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिकलाही आपल्या प्रदर्शनाचा स्तर उंचावावा लागेल. ग्लेन मॅक्सवेल आणि रजत पाटीदारला चांगल्या सुरुवातीला मोठ्या धावसंख्येत रुपांतरीत करावं लागेल.
हेझलवूड-सिराजची RCB ला चिंता
गोलंदाजीत हर्षल पटेल आणि वानिंदु हसरंगाच प्रदर्शन चांगलं आहे. मागच्या सामन्यात पंजाबच्या अन्य गोलंदाजांची धुलाई झाली. त्यावेळी दोघांनी चांगले स्पेल टाकले. जोश हेझलवूड आणि मोहम्मद सिराजची खराब गोलंदाजी आरसीबीसाठी मुख्य चिंतेचा विषय आहे.
गुजरातला हवा आणखी एक विजय
गुजरातचा संघ उद्याचा सामना हरला तरी त्याने काही फरक पडणार नाही. ते पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर आहेत. अंतिम फेरीत पोहोण्याच्या त्यांना दोन संधी मिळतील. ऋदिमान साहा, डेविड मिलर, राहुल तेवतिया, कॅप्टन हार्दिक पंड्या यांच्यावर त्यांची मदार आहे. गोलंदाजीत मोहम्मद शमी, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि अल्जारी जोसेफ प्रभावी गोलंदाजी करतायत.