Video : अक्षर पटेलला टीम इंडियामध्ये ‘बापू’ का बोलतात? जाणून घ्या या मागचा रंजक किस्सा
Axar Patel, Delhi Capitals, IPL 2023: अक्षर पटेल अष्टपैलू खेळाडू असून अनेकदा टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अक्षरला बापू का संबोधलं जातं? जाणून घ्या
मुंबई : भारतीय संघातील बऱ्याचशा खेळाडूंना टोपणनाव आहेत. त्यामुळे या खेळाडूंना त्या टोपणनावाने का संबोधलं जातं? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. टीम इंडियात रवींद्र जडेजाला जड्डू, विराट कोहलीला चिकू आणि अक्षर पटेलला बापू या नावाने बोलवलं जातं. पण या सर्वांना टोपणनाव ठेवण्यामागे महेंद्रसिंह धोनीचा हात आहे. हो तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. आता अक्षर पटेलने स्वत: टिम इंडियात बापू का बोलतात यामागचा खुलासा केला आहे. तसेच महेंद्रसिंह धोनीने बापू नाव कसं पाडलं या मागचा रंजक किस्सा सांगितला आहे.
बापू नावामागे महेंद्रसिंह धोनी
आयपीएलच्या एका सोशल मीडियावर अक्षर पटेलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या अक्षर पटेलनं बापू नावामागची कथा सांगितली आहे. बापू हे नाव महेंद्रसिंह धोनीने पाडल्याचं सांगितलं.
“जेव्हा मी गोलंदाजी करत होतो, तेव्हा धोनीने विचारलं की तुला काय नावाने हाक मारू? अक्षर तर बोलू शकत नव्हतो. पटेल पण सांगता आलं नाही. मग काय बोलायचं हा प्रश्न पडला.”, असं अक्षर पटेलनं सांगितलं.
“त्याच सामन्यात रवींद्र जडेजा पण खेळत होता. त्याला गुजरातमध्ये बापू संबोधलं जातं.तेव्हा महेंद्रसिंह धोनीला वाटलं प्रत्येक गुजराती बापू असतो. तेव्हापासून त्याने बापू बोलणं सुरु केलं. एकदा त्या नावाने हाक मारल्यानंतर इतर खेळाडू त्याच नावाने हाक मारू लागले.”, असं अक्षर पटेलनं पुढे सांगितलं.
View this post on Instagram
IPL 2023 मध्ये दिल्ली कमबॅक करणार
अक्षर पटेल आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे. या स्पर्धेत दिल्लीची सुरुवात एकदम निराशाजनक आहे. सुरुवातीच्या चारही सामन्यात दिल्लीनं पराभवाचं तोंड पाहिलं आहे. पण चारही सामना गमावले असले तरी अक्षर पटेल काहीच चिंता नाही. संघ पुन्हा ताकदीने उभारी घेईल असं त्याने सांगितलं.
दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आज सामना होत आहे. यात दोन्ही विजयासाठी प्रयत्नशील आहेत. दिल्लीला पहिल्या विजयाची, तर बंगळुरुला विजयी गाडी रुळावर आणण्याची धडपड आहे.
दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.