IPL ट्रॉफी जिंकून संघाची शान वाढवणारा डेव्हिड वॉर्नर संघाबाहेर का? प्रशिक्षकांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
नरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे (Sunrisers Hyderabad) मार्ग आता वेगळे झाले आहेत.
मुंबई : सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे (Sunrisers Hyderabad) मार्ग आता वेगळे झाले आहेत. त्यांच्यातील मतभेदाला अंतिम स्वरूप मिळाले आहे. या हंगामात वॉर्नर यापुढे सनरायझर्सकडून कोणताही सामना खेळणार नसल्याचे वृत्त आहे. InsideSport.co च्या मते, हा निर्णय खेळाडू आणि फ्रँचायझी दोघांनी परस्पर मान्य केला आहे. (Why David Warner out of Playing XI of Sunrisers Hyderabad, Trevor Bayliss Answer)
डेव्हिड वॉर्नरला आता प्लेईंग इलेव्हनमध्येदेखील स्थान मिळत नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांना चाहते प्रश्न विचारत आहेत. सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक ट्रेवर बेलिस याबाबत म्हणाले की, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात तरुणांना संधी देण्यासाठी प्लेईंग इलेव्हनमधून डेव्हिड वॉर्नरला वगळण्यात आले.
सनरायझर्स प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर आहे. सनरायझर्सने राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव केला. यामध्ये सलामीवीर जेसन रॉय आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी अर्धशतके केली. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बेलिस म्हणाले की, ‘आम्ही पुढील फेरीत जाऊ शकलो नाही, म्हणून आम्ही तरुण खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून त्यांना अनुभव मिळेल. संघात असे अनेक युवा खेळाडू आहेत ज्यांना आतापर्यंत प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्यांना संधी द्यायला हवी. हा ट्रेंड पुढील सामन्यांमध्येही कायम राहील. डेव्ह (वॉर्नर) हॉटेलमध्ये मॅच पाहात होता आणि टीमला चीअर करत होता. आम्ही सर्वजण एकत्र आहोत.
वॉर्नर आणि हैदराबादच्या वाटा वेगळ्या?
वॉर्नर आणि हैदराबाद संघ या दोघांमधील दीर्घ सहवास आता संपला असल्याचे सूत्रांनी सांगितले. या मालिकेची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा आयपीएल 2021 मध्ये डेव्हिड वॉर्नर हिरोपासून झिरो बनत गेला. वॉर्नरने कर्णधार म्हणून हंगामाची सुरुवात केली. पण आधी त्याचे कर्णधारपद काढून टाकण्यात आले आणि आता हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले, त्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजाने मैदानावर येण्याऐवजी हॉटेलच्या खोलीत राहणे पसंत केले.
सूत्रांनी पुढे सांगितले, “पुढील हंगामासाठी नवीन लिलाव होणार आहे. सर्व संघ पुन्हा नव्याने सुरू होतील. गेल्या 2 हंगामात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खराब राहिली आहे. त्यामुळे ऑरेंज आर्मीलाही एक उत्तम संघ बनवण्याची संधी मिळणार आहे. वॉर्नर आणि SRH ने याआधी चांगलं प्रदर्शन केलं आहे. परंतु आमच्यासाठी नव्याने सुरुवात करण्याची वेळ आली आहे.”
IPL 2021 च्या पहिल्या टप्प्यात संघ आणि वॉर्नरमध्ये मतभेद
आयपीएल 2021 च्या पूर्वार्धातही वॉर्नर आणि संघ व्यवस्थापनामध्ये वाद झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आणि कर्णधारपद केन विल्यमसनकडे सोपवण्यात आले. आता आयपीएल 2021 च्या उत्तरार्धात सलग दोन सामन्यांमध्ये वॉर्नरच्या अपयशानंतर जेसन रॉयला संघात स्थान देण्यात आले. वॉर्नर आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला, तर दुसऱ्या सामन्यात 2 धावांवर बाद झाला. त्यानंत कालच्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं नाही.
हे ही वाचा
IPL 2021: बलाढ्य सीएसके संघाची कमकुवत बाजू कोणती?, वीरेंद्र सेहवागने सांगितली आतली माहिती
(Why David Warner out of Playing XI of Sunrisers Hyderabad, Trevor Bayliss Answer)