CSK IPL 2023 Winner : Hardik pandya ला ‘त्याची’ किंमत खूप उशिरा समजली
CSK IPL 2023 Winner : आधी त्याला डावलून स्वत: त्या क्रमांकावर बॅटिंगला यायचा. हार्दिक पांड्या त्याला बाहेर का बसवायचा?. गुजरात टायटन्सचा काल चेन्नई सुपर किंग्सने पराभव केला.
अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये सगळ्यांच्या नजरा शुभमन गिलवर होत्या. पण कमाल केली 21 वर्षाच्या मुलाने. या प्लेयरच नाव आहे, साई सुदर्शन. त्याने काल आयपीएल फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध जबरदस्त बॅटिंग केली. आपल्या खेळाने साईने सर्वांच मन जिंकलं. साईने 47 चेंडूत 96 धावा फटकावल्या. या खेळाडूने फायनलमध्ये फोर-सिक्सचा पाऊस पाडला. त्याच्या इनिंगच्या बळावरच गुजरात टायटन्सने 214 धावांचा डोंगर उभारला.
साई सुदर्शनचा स्ट्राइक रेट 204 पेक्षा जास्त होता. त्याने 6 सिक्स आणि 8 फोर मारले. लेफ्टी बॅट्समन साई सुदर्शन शुभमन गिलची विकेट पडल्यानंतर क्रीजवर आला. साईने आपल्या टीमला निराश केलं नाही.
त्याने फोर-सिक्सचा पाऊस पडला
साईने विकेटकीपर वृद्धीमान साहाच्या जोडीने स्कोरबोर्डवर वेगाने धावा वाढवल्या. साहा आणि साईमध्ये 42 चेंडूत 64 धावांची भागीदारी झाली. सुदर्शनने फक्त 33 चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्यानंतर त्याने फोर-सिक्सचा पाऊस पडला. पुढच्या 44 धावा त्याने 14 चेंडूत केल्या. साईने कॅप्टन पांड्यासोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी 33 चेंडूत 81 धावांची पार्ट्नरशिप केली. सुदर्शनची शतकाच्या दिशेने कूच सुरु होतं. पण 97 रन्सवर त्याची इनिंग संपली.
हार्दिक पांड्याला दाखवून दिली क्षमता
सुदर्शनने हार्दिक पांड्यासमोर तुफानी बॅटिंग केली. त्याच्या या इनिंगच एक वेगळ महत्व आहे. कारण हार्दिकने दमदार परफॉर्मन्स असूनही सुदर्शनला सर्व मॅचमध्ये खेळवलं नाही. सुदर्शनला चालू सीजनमध्ये फक्त 8 सामन्यात संधी मिळाली. गुजरातची टीम एकूण 17 मॅच खेळली. म्हणजे गुजरातने सुदर्शनला 9 सामन्यात बाहेर बसवलं. पण बाहेर का बसवलं?
सुदर्शनने आपल्या प्रदर्शनाने सर्वांना उत्तर दिलं. त्याने आयपीएल 2023 मध्ये 8 सामन्यात 51 च्या सरासरीने 362 धावा केल्या. त्यासा स्ट्राइक रेट 141 पेक्षा जास्त होता. सुदर्शनला सर्व सामन्यात संधी मिळाली असती, तर त्याने कमीत कमी 600 धावा केल्या असत्या. साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला यायचा. हार्दिकने त्याला काही सामन्यात त्याला बाहेर बसवून स्वत: त्या नंबरवर बॅटिंगसाठी आला.