Prithvi Shaw Triple Century: 379 धावा ठोकूनही पृथ्वीला टीम इंडियात जागा का मिळत नाही? जाणून घ्या 4 कारणं

Prithvi Shaw Triple Century: पृथ्वी शॉ मागच्या दीड वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. 25 जुलै 2021 रोजी तो शेवटच्या टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसला होता. शॉ ने टी 20 मध्ये डेब्यु केला व पहिल्या चेंडूवर बाद झाला.

Prithvi Shaw Triple Century: 379 धावा ठोकूनही पृथ्वीला टीम इंडियात जागा का मिळत नाही? जाणून घ्या 4 कारणं
Prithvi shaw
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 1:03 PM

Prithvi Shaw Triple Century: पृथ्वी शॉ ची बॅट पुन्हा एकदा तळपली. त्याने आपल्या बॅटची ताकत दाखवून दिली. या आक्रमक बॅट्समनने आसाम विरुद्ध रणजी ट्रॉफीमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकवली. शॉ ने 379 धावांची खेळी केली. पृथ्वी शॉ ने 383 चेंडूत 379 धावा फटकावल्या. टेस्ट मॅचमध्ये त्याने पूर्णपणे वनडे स्टाइल बॅटिंग केली. या खेळी दरम्यान पृथ्वीने 49 चौकार आणि 4 सिक्स मारले. पृथ्वी शॉ ने पुन्हा एकदा दमदार खेळ दाखवलाय. त्याच्या खेळीने पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय, ज्याच उत्तर लाखो चाहत्यांना अपेक्षित आहेत. पृथ्वी शॉ ला टीम इंडियात जागा का मिळत नाही? हा तो प्रश्न आहे.

का सिलेक्टर्स दखल घेत नाही?

पृथ्वी शॉ मागच्या दीड वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. 25 जुलै 2021 रोजी तो शेवटच्या टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसला होता. शॉ ने टी 20 मध्ये डेब्यु केला व पहिल्या चेंडूवर बाद झाला. पृथ्वी शॉ सध्या वनडे, टी 20 किंवा टेस्ट कुठल्याही टीममध्ये नाहीय. इंडिया ए टीममध्ये सुद्धा त्याची निवड झालेली नाही. असं काय कारण आहे, की सिलेक्टर्स पृथ्वी शॉ ची दखल घेत नाहीयत? यामागे 4 कारण आहेत.

पहिलं कारण

खराब फिटनेस हे पृथ्वी शॉ ला टीम इंडियात न निवडण्यामागच एक कारण आहे. टीम इंडियात फिटनेसला खूप महत्त्व दिल जातं. पृथ्वी शॉ या बाबतीत थोडा मागे आहे. त्याच्यावयाचे दुसरे खेळाडू शुभमन गिल, इशान किशन बरेच फिट आहेत. शॉ सतत आपल्या फिटनेसवर मेहनत घेतोय.

दुसरं कारण

पृथ्वी शॉ एक बॅट्समन आहे. तो बॉलिंग करत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी फिल्डिंग महत्त्वाची ठरते. भारतीय टीममधले मेन बॅट्समन फिल्डिंग चांगली करतात. पण पृथ्वी शॉ यामध्ये मागे आहे. वर्ष 2020 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एडिलेड टेस्टमध्ये त्याच्या हातातून कॅच सुटली होती. त्यानंतर कॅप्टन विराट कोहली त्याच्यावर नाराज झाला होता. तीच पृथ्वी शॉ ची लास्ट टेस्ट मॅच ठरली. त्याला टीममधून बाहेर करण्यात आलं.

तिसरं कारण

पृथ्वी शॉ बाहेर गेल्यानंतर टीम इंडियात शुभमन गिलची एंट्री झाली. केएल राहुलच्या रुपात टीम इंडियाकडे ओपनर आहे. रोहित शर्मा सुद्धा सलामीला येतो. त्यामुळे पृथ्वी शॉ साठी ओपनिंग बॅट्समन म्हणून टीममध्ये स्थान बनवणं सोप नाहीय. गिल आणि केएल राहुलची टेस्ट ओपनर म्हणून विशेष कामगिरी नाहीय. पण टीम मॅनेजमेंटचा त्यांच्यावर विश्वास आहे. चौथ कारण

बेशिस्त हे सुद्धा पृथ्वी शॉ च्या टीमबाहेर असण्यामागच एक कारण असल्याच बोललं जातं. सोशल मीडियावर अनेकदा याबद्दल चर्चा होते. पण टीव्ही9 मराठी याला दुजोरा देणार नाही.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.