IND vs AUS: Suryakumar Yadav ची सर्वात मोठी ताकत काय? विराट कोहलीने 4 पॉइंटमध्ये समजावलं
IND vs AUS: सूर्यकुमार इतका यशस्वी कसा? विराटने सांगितलेले हे 4 पॉइंट एकदा वाचा
मुंबई: सध्या भारतीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवच्या नावाची मोठी चर्चा आहे. विकेट कुठलीही असो, समोर कुठलीही टीम असो, सूर्यकुमारला फरक पडत नाही. सूर्यकुमार प्रत्येक चेंडूबरोबर योग्य तो न्याय करतो. खराब लाइन लेंग्थच्या चेंडूना सूर्यकुमार बरोबर सीमारेषा दाखवतो. दुसऱ्या फलंदाजांच्या फॉर्ममध्ये सातत्य दिसत नाही. तेच सूर्याच्या फलंदाजीत कमालीच सातत्य आहे.
हैदराबादमध्ये सूर्यकुमारने आक्रमक फलंदाजी केली. त्याने 36 चेंडूत 69 धावा फटकावल्या. टीम इंडियाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने इनिंगमध्ये पाच चौकार आणि तितकेच षटकार लगावले. विराट कोहलीला जेव्हा याबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी त्याने सूर्यकुमार यादवचे चार प्लस पॉइंट सांगितले.
सूर्यकुमार यादवची पहली ताकत
विराट कोहलीच्या मते सूर्यकुमार यादवची सर्वात मोठी ताकत त्याचं डोकं आहे. काय करायचं आहे, ते सूर्यकुमारच्या डोक्यात स्पष्ट असतं. त्याला आपली भूमिका ठाऊक असते. तो कुठल्याही परिस्थितीत खेळू शकतो.
सूर्यकुमार यादवची दुसरी ताकत
दबावाखाली खेळण्याचा अनुभव ही सूर्यकुमार यादवची दुसरी ताकत आहे. “सूर्यकुमार कुठल्याही परिस्थितीत खेळू शकतो. त्याने इंग्लंड विरुद्ध शतक झळकावलं. आशिया कपमध्ये चांगली फलंदाजी केली” असं विराट म्हणाला.
सूर्यकुमार यादवची तिसरी ताकत
सूर्यकुमार यादवच्या पोतडीत भरपूर फटके आहेत. तो वेगवेगळे शॉट्स खेळू शकतो. कुठला शॉट कधी मारायचा हे त्याला ठाऊक आहे. सूर्यकुमार यादवकडे टायमिंग आहे, असं विराटने सांगितलं.
सूर्यकुमार यादवची चौथी ताकत
स्वत:वर असलेला विश्वास ही सूर्यकुमारची चौथी मोठी ताकत आहे. सूर्यकुमार यादवला आपला खेळ चांगला ठाऊक आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये सूर्या चमकदार कामगिरी करतोय. सूर्यकुमारच फुटवर्क सुद्धा मोठी ताकत आहे. तो एकच चेंडू वेगवेगळ्या दिशांना खेळू शकतो.