IND vs PAK : पाकिस्तानसमोर रोहित, विराट, सूर्यासारखे दिग्गज फेल कसे ठरले? ‘ही’ आहेत 4 कारण

India vs Pakistan T20 World Cup 2024 : पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाने 8 फलंदाजांना संधी दिली, जे आक्रमक बॅटिंगसाठी ओळखले जातात. मात्र, असं असूनही टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, कोणीच चाललं नाही.

IND vs PAK : पाकिस्तानसमोर रोहित, विराट, सूर्यासारखे दिग्गज फेल कसे ठरले? 'ही' आहेत 4 कारण
IND vs PAK Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 9:09 AM

टीम इंडियाकडे मजबूत फलंदाजांची फळी आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे. हे फलंदाज प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांची वाट लावू शकतात. भल्या, भल्या टीम्सना गार करण्याची या फलंदाजांमध्ये ताकद आहे. पण काल न्यू यॉर्कच्या स्टेडियममध्ये भारताची ही अव्वल बॅटिंग लाइन अप फेल ठरली. पाकिस्तानच्या गोलंदाजी युनिटने भारतीय फलंदाजांना धावांसाठी चांगलच तरसवलं. न्यू यॉर्कच्या विकेटवर रोहित, विराट, सूर्यकुमार, शिवम कोणीच चाललं नाही.

टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना फक्त 119 धावा केल्या. टीम इंडियाकडे एकापेक्षा एक सरस फलंदाज असूनही कोणी अर्धशतकाची वेस ओलांडू शकलं नाही. फक्त ऋषभ पंतने सर्वाधिक 42 धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेलने सर्वाधिक 20 धावा केल्या. 8 दमदार फलंदाज खेळवूनही टीम इंडियाला पाकिस्तानसमोर अपयश का आलं? हा प्रश्न उरतो.

पहिलं कारण

टीम इंडियाचे फलंदाज फेल होण्याच पहिल कारण आह, पीचचा पेस. विराट कोहली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत याच पेसमुळे आऊट झाले. सगळ्यांना वाटत होतं की, चेंडू वेगात बॅटवर येईल, पण असं झालं नाही.

दुसरं कारण

खेळपट्टी थोडी कठीण होती, पण हे सुद्धा खरं आहे की, टीम इंडियाच्या फलंदाजांच शॉट सिलेक्शन चुकीच होतं. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत सारख्या फलंदाजांनी खराब शॉट खेळून विकेट गमावल्या. रोहित शर्मा सुद्धा असाच खराब फटका खेळून आऊट झाला.

तिसरं कारण

टीम इंडिया थेट आयपीएल खेळून न्यू यॉर्कमध्ये आली आहे. आयपीएलच्या पीचवर सहजतेने धाव होत होत्या. पण न्यू यॉर्कमध्ये या उलट परिस्थिती आहे. आयपीएलमध्ये चेंडू बॅटवर सहज येत होता. तेच न्यू यॉर्कमध्ये शॉट खेळताना अडचणी आहेत. न्यू यॉर्कची विकेट गोलंदाजीला अनुकूल आहे. त्यामुळे शॉट सिलेक्शन काळजीपूर्वक करण गरजेच आहे. पण टीम इंडियाच्या फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याच्या नादात विकेट बहाल केली.

चौथ कारण

भारतीय फलंदाज चुकीच फटके खेळले. पण पाकिस्तानी पेसर्सनी सुद्धा कमालीची गोलंदाजी केली. त्यांनी पीचकडून मिळणारी मदत समजून घेतली व तशी आपल्या गोलंदाजीची लेंग्थ ठेवली. नसीन शाह आणि हॅरिस रौफने प्रत्येकी 3-3 विकेट काढले. मोहम्मद आमिरने 2 विकेट काढले. शाहीन आफ्रिदीला एक विकेट मिळाला.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.