Asia cup: टी 20 क्रिकेट मध्ये दिनेश कार्तिकने ऋषभ पंतवर मात केली ?

Asia cup: भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यात रविवारी टॉस झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

Asia cup: टी 20 क्रिकेट मध्ये दिनेश कार्तिकने ऋषभ पंतवर मात केली ?
Dinesh Karthik-Rishabh PantImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 7:58 AM

मुंबई: भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यात रविवारी टॉस झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने प्लेइंग 11 बद्दल माहिती देताना, ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकला संघात स्थान दिल्याचं जाहीर केलं. या निर्णयानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आतापर्यंत तिन्ही फॉर्मेट मध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून ऋषभ पंतला (Rishabh Pant) टीम इंडियाची पहिली पसंती आहे. पण आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा, हेड कोच राहुल द्रविड जोडीने ऋषभ ऐवजी दिनेश कार्तिकवर विश्वास दाखवला. त्यामुळे टी 20 फॉर्मेट मध्ये दिनेश कार्तिकने ऋषभ पंतवर मात केली का?. टी 20 वर्ल्ड कप मध्ये ऋषभ पंत 12 व्या खेळाडूची भूमिका पार पाडणार का? अशी चर्चा सुरु झाल्या आहेत.

रोहित काय म्हणाला?

“आजच्या सामन्यासाठी आम्ही दिनेश कार्तिकला प्राधान्य दिलं आहे. ऋषभ पंत आज बाहेर बसेल. वेळेची जी गरज असेल, ते आम्ही सर्व करु” असं रोहित टॉसच्यावेळी रविवारी म्हणाला. दिनेश कार्तिकच्या प्लेइंग 11 मधील समावेशामुळे ऋषभ पंतचं अंतिम अकरामधील स्थान निश्चित नसल्याचं स्पष्ट झालं. टॉस होण्याआधी ऋषभ पंत प्लेइंग 11 चा भाग असेल, असं सर्वांना वाटत होतं. पण टीम मॅनेजमेंटचा वेगळा विचार करते.

दोघांमध्ये तीव्र स्पर्धा

आता आशिया कप मधील उर्वरित सर्व सामन्यात दिशेन कार्तिकचा प्लेइंग 11 मध्ये समावेश होतो का? ते पहाव लागेल. असं झाल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी ऋषभ ऐवजी दिनेश टीम मॅनेजमेंटची पहिली पसंती असेल. विकेटकीपरच्या जागेसाठी दोघांमध्ये तीव्र स्पर्धा आहे, हे देखील तितकच स्पष्ट आहे.

दिनेश कार्तिकला निवडण्यामागे हे कारण

दिनेश कार्तिकचा संघात समावेश करतानाच त्याचा रोल स्पष्ट आहे. दिनेश कार्तिकला फिनिशर म्हणून संघात निवडण्यात आलय. कोच राहुल द्रविड यांनी आधी सुद्धा हे स्पष्ट केलय. डेथ ओव्हर्स म्हणजे हाणामारीच्या षटकात दिनेश कार्तिकची भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्याचवेळी ऋषभ पंतला टी 20 मध्ये वेगवेगळ्या स्थानांवर खेळवण्यात आलय. त्याला सलामीला पाठवण्याचा प्रयोगही झाला आहे. कसोटी आणि वनडेच्या तुलनेत ऋषभ पंत टी 20 मध्ये तेवढा प्रभावी वाटला नाही. कुठेतरी थोडा संघर्ष करताना दिसला. हे सुद्धा दिनेश कार्तिकला प्राधान्य देण्यामागच एक कारण असू शकतं.

दोघांना एकत्र प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल?

“दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत दोघांचा संघात समावेश करायचा असेल, तर टॉप ऑर्डर मधील एका फलंदाजाला बाहेर बसवाव लागेल, तर शक्य नाहीय, दोघांना एकत्र प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल, असं वाटत नाही” असं चेतेश्वर पुजारा इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.