WI vs BAN: अरेरे, बांग्लादेशची ही काय अवस्था, सहा बॅट्समन 0 वर आऊट, वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी पार वाट लावली
बांगलादेशचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर (Bangladesh West indies Tour) आहे. एंटीगामध्ये पहिला कसोटी सामना (First Test Match) सुरु आहे. या कसोटी सामन्यात पहिल्यादिवशीच एक वेगळं दृश्य पहायला मिळालं.
मुंबई: बांगलादेशचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर (Bangladesh West indies Tour) आहे. एंटीगामध्ये पहिला कसोटी सामना (First Test Match) सुरु आहे. या कसोटी सामन्यात पहिल्यादिवशीच एक वेगळं दृश्य पहायला मिळालं. जे हैराण करुन टाकणार होतं. या कामगिरीमुळे बांगलादेशच्या संघाची इतिहासात नोंद झाली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध (WI vs BAN) प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा डाव कोलमडला. त्यांच्या फलंदाजांना खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी करणं जमलं नाही. वेस्ट इंडिज गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर त्यांचे सहा फलंदाज खातही उघडू शकले नाहीत. त्यांचे सहा फलंदाज शुन्यावर बाद झाले. सलग दुसऱ्याकसोटी सामन्यात बांग्लादेश बरोबर असं घडलं आहे. त्यामुळेच कसोटी इतिहासात बांगलादेशी संघाची नोंद झाली.
इतकी कमी धावसंख्या होण्यामागचं कारण आहे…
एंटीगा कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा डाव अवघ्या 103 धावात आटोपला. इतकी कमी धावसंख्या होण्यामागचं कारण आहे, त्याची फलंदाजी. त्यांचे सहा फलंदाज शुन्यावर बाद झाले. बांगलादेशकडून शाकीब अल हसनने सर्वाधिक 51 धावा केल्या.
हे सहा फलंदाज शुन्यावर बाद
बांगलादेशचे जे सहा फलंदाज खात उघडू शकले नाहीत, त्यात टॉप ऑर्डरचे 3, मधल्याफळीतील 1 आणि खालच्या ऑर्डरमधील दोन फलंदाज आहेत. महमुदउल हसन जॉय, नजमुल शंटो, मोमिनुल हक, नरुल हसन, मुस्तफिजुर रहमान आणि खालिद अहमद हे शुन्यावर आऊट होणारे सहा फलंदाज आहेत.
अल्जारी जोसेफचा भेदक मारा
अल्जारी जोसेफ आणि जायडेन सील्स हे वेस्ट इंडिज कडून दोन यशस्वी गोलंदाज ठरले. दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्यात. त्याशिवाय केमर रॉच आणि काइल मायर्स यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
Bangladesh’s six ducks earlier today are the joint-most in a Test innings #WIvBAN
They also had as many 0s in the first innings of their previous Test
Full list ▶️ https://t.co/nS3jA3vZHA pic.twitter.com/1W0BYuWxGN
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 16, 2022
सलग दुसऱ्या कसोटीत शुन्यावर आऊट
बांगलादेश बरोबर सलग दुसऱ्याकसोटी सामन्यात असं झालय, जेव्हा त्यांचे सहा फलंदाज शुन्यावर बाद झाले. मागच्या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातही त्याने सहा फलंदाज खात उघडू शकले नव्हते. बांगलादेशने तो कसोटी सामना 10 विकेटने गमावला होता. कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेश पहिला संघ बनला आहे, त्यांचे सहा फलंदाज सलग दोन सामन्यात शुन्यावर आऊट झाले.
एंटीगा कसोटीच्या पहिल्यादिवशी बांगलादेशचा डाव 103 धावात आटोपला. वेस्ट इंडिजने दिवसअखेर 2 बाद 95 धावा केल्या आहेत. टेस्ट कॅप्टन क्रेग ब्रेथवेट 42 धावांवार नाबाद आहे. बोन्नर 12 धावांवर खेळतोय.