WI vs IND 3rd T20 | पहिल्या विजयानंतर हार्दिक जे बोलला, त्यामुळे रोहित-कोहलीचे फॅन्स नक्कीच खवळतील

WI vs IND 3rd T20 | गुयानामध्ये मंगळवारी टीम इंडियाने टी 20 सीरीजमधील पहिला विजय मिळवला. याच प्रोविडेंस स्टेडियममध्ये 48 तास आधी टीम इंडियाचा सीरीजमधील सलग दुसरा पराभव झाला होता.

WI vs IND 3rd T20 | पहिल्या विजयानंतर हार्दिक जे बोलला, त्यामुळे रोहित-कोहलीचे फॅन्स नक्कीच खवळतील
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 8:05 AM

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमसाठी मागच्या एक दशकात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आपल्या बॅटने भरपूर योगदान दिलय. तिन्ही फॉर्मेटमध्ये या दोन्ही मॉडर्न सुपरस्टार्सनी धावांचा पाऊस पाडला. टीम इंडियाला अनेक सामने आणि सीरीज जिंकवून दिल्या. आता हे दोघे नसताना, टीम इंडियाचा पराभव होतो, तेव्हा चाहत्यांना चिंता वाटण स्वाभाविक आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर T20 सीरीजमध्ये पहिल्या दोन सामन्याात टीम इंडियाचा पराभव झाला.

या पराभवानंतर रोहित-विराटचा टीममध्ये समावेश करावा,अशी मागणी सुरु झाली. आता तिसऱ्या T20 सामन्यात अखेर टीम इंडियाने पहिला विजय मिळवलाय. यानंतर कॅप्टन हार्दिक पांड्याने जे संकेत दिलेत, ते कदाचित अनेक क्रिकेट फॅन्सन आवडणार नाही.

अखेर टीम इंडियाने विजयाला गवसणी घातली

गुयानामध्ये मंगळवारी टीम इंडियाने टी 20 सीरीजमधील पहिला विजय मिळवला. याच प्रोविडेंस स्टेडियममध्ये 48 तास आधी टीम इंडियाचा सीरीजमधील सलग दुसरा पराभव झाला होता. पाच मॅचच्या सीरीजमध्ये वेस्ट इंडिज 2-0 ने आघाडीवर होती. त्यामुळे युवा टीम आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होतं. निशाण्यावर टीमचे फलंदाज होते. आयपीएलच्या दोन महिन्यात दमदार फलंदाजी करणारे हे खेळाडू इथे फेल ठरत होते. अखेर तिसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाला सूर गवसला व 7 विकेटने विजय मिळवला.

दोघांचा समावेश नाही

सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर फॅन्स रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा टीममध्ये समावेश करण्याची मागणी करत होते. मागच्यावर्षी T20 वर्ल्ड कप झाला. त्यानंतर या दोघांचा T20 फॉर्मेटमध्ये समावेश केलेला नाहीय. भविष्याचा विचार करुन टीममध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत. प्रयोग सुरु आहेत. हार्दिक पांड्या काय म्हणाला?

मॅच संपल्यानंतर बोलताना हार्दिकने काही संकेत दिले. “हीच टीम आता पुढे खेळत राहील. रोहित-कोहली सारख्या सिनियर खेळाडूंच या फॉर्मेटमध्ये पुनरागमन होणार नाही. दोन पराभव किंवा दोन विजयाने गोष्टी बदलत नाहीत. टीम भविष्याच्या योजनांवर काम करतेय” असं हार्दिक पांड्या म्हणाला.

बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....