WI vs IND | हार्दिक पांड्याचा स्वार्थीपणा पाहून तिलक वर्माने त्याच्याशी हात मिळवणं टाळलं का? VIDEO
WI vs IND 3rd T20 | जिंकूनही कॅप्टन हार्दिक पांड्या ट्रोल होतोय. तिलक वर्मा 49 धावांवर नाबाद राहिला. मॅच संपल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
गुयाना : टीम इंडियाने तिसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजवर 7 विकेटने एकतर्फी विजय मिळवला. या विजयामुळे टीम इंडियाच मालिकेत आव्हान टिकून आहे. वेस्ट इंडिजवर विजय मिळवल्यानंतर एक वेगळा वाद निर्माण झालाय. टीमचा कॅप्टन हार्दिक पांड्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय. पांड्याने वेस्ट इंडिज विरुद्ध सिक्स मारुन टीमला विजय मिळवून दिला. पण या सिक्सच्या नादात तिलक वर्माची हाफ सेंच्युरीची संधी हुकली.
तिलक वर्मा 49 धावांवर नाबाद राहिला. मॅच संपल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
या व्हिडिओमध्ये काय आहे?
व्हिडिओमध्ये एक खास गोष्ट आहे. मॅच संपल्यानंतर पांड्याने सर्व खेळाडूंशी हात मिळवला. त्यानंतर तिलक वर्माशी हस्तांदोलन करण्यासाठी त्याने हात पुढे केला. पण तिलक वर्माने हात मिळवला नाही. तिलक वर्मा आपल्या कॅप्टनच्या सिक्सने नाराज झाला का? हा प्रश्न निर्माण झालाय. याच नाराजीमुळे त्याने पांड्याशी हस्तांदोलन टाळल का?
Hardik Pandya smashes it for six to pull India back to 2-1 against West Indies in the T20I Series ??#WIvIND pic.twitter.com/ryMVO522YY
— Cricket on TNT Sports (@cricketontnt) August 8, 2023
काही प्रॉब्लेम नसेलही, पण…
क्रिकेट एक टीम गेम आहे. व्यक्तीगत प्रदर्शनापेक्षा टीमचा विजय जास्त महत्त्वाचा असतो. मॅच संपल्यानंतर हार्दिक पांड्याने हात मिळवण्यासाठी पुढे केला. कदाचित ते तिलक वर्माने ते पाहिलं नसेल. पांड्या आणि तिलकमध्ये कुठली समस्या नसेल. पण फॅन्स मात्र हार्दिकला ट्रोल करतायत. तिलकने या सीरीजमध्ये किती धावा केल्यात?
तिलक वर्माने या टी 20 सीरीजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या लेफ्टी बॅट्समनने तिन्ही सामन्यात जबरदस्त प्रदर्शन केलं. तिलकने पहिल्या मॅचमध्ये 39 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात 51 आणि मंगळवारी तिसऱ्या टी 20 सामन्यात नाबाद 49 धावा केल्या. तिलक या सीरीजमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 69.50 च्या सरासरीने 139 धावा केल्या आहेत. त्याची बॅटिंग स्टाइल पाहून तो भविष्यात तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळेल, असं दिसतय.