WI vs IND: ‘आज कुछ तूफानी करते हैं’, च्या नादात Rishabh Pant चा खेळच संपला, VIDEO
WI vs IND: आज कुछ तूफानी करते हैं', ही एका कोल्ड ड्रिंकची टॅगलाइन आहे. ऋषभ पंतने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात या टॅगलाइनला थोडं जास्तच सीरीयसली घेतलं.

मुंबई: ‘आज कुछ तूफानी करते हैं’, ही एका कोल्ड ड्रिंकची टॅगलाइन आहे. ऋषभ पंतने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात या टॅगलाइनला थोडं जास्तच सीरीयसली घेतलं. ऋषभ पंत आक्रमक खेळायला गेला. स्टार्ट त्याला चांगली मिळाली होती. पण गाडी पळवताना गियर बदलावा लागतो, याचा कदाचित त्याला विसर पडला असावा. ऋषभ पंत फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा भारतीय संघ अडचणीत होता. त्याने जोरदार सुरुवात केली. ऋषभकडून आज दमदार इनिंग पहायला मिळेल, असं वाटलं. अशी इनिंग खेळण्यासाठी नुसता जोश चालत नाही. संतुलनही ठेवावं लागतं. पण हीच गोष्ट ऋषभ पंतला जमली नाही.
अतिउत्साह नडला
ऋषभ पंतने 12 चेंडूत 200 च्या स्ट्राइक रेटने 24 धावा ठोकल्या. यात दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. त्याची तुफानी फलंदाजी पाहून आज ऋषभ पंत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई करणार, असं वाटलं. पण पुढच्याच क्षणी झटका लागतो, कारण ऋषभ पंतचा अतिउत्साह अंगाशी येतो. कालच्या सामन्यातही हेच झालं.
भारताच्या डावात 7 व्या षटकात हे घडलं. अकिला हुसैनच्या ओव्हर मध्ये दुसऱ्या चेंडूवर त्याने चौकार मारला होता. 13 षटकांचा खेळ बाकी होता. भारतीय संघ अडचणीत होता. अशा स्थितीत ऋषभने स्ट्राइक रोटेट करुन आपल्या सहकारी फलंदाजाला द्यायला पाहिजे होती. दुसऱ्या चेंडूवर त्याने चौकार ठोकला होता, तर तिसऱ्या चेंडूवर तो षटकार मारायला गेला. पण याच नादात त्याचा विकेट गेला.
Poor shot from @RishabhPant17. @AHosein21‘s guile proves too good, and he perishes, caught in the deep.
Watch all the action from the India tour of West Indies LIVE, only on #FanCode ? https://t.co/RCdQk12YsM@BCCI @windiescricket #WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/rAQFrW2HeF
— FanCode (@FanCode) August 1, 2022
बिनधास्त फलंदाज आहे, हे मान्य, पण….
ऋषभ पंत आक्रमक खेळतो, तो त्याचा नैसर्गिक खेळ आहे, तो बिनधास्त फलंदाज आहे, हे मान्य. पण कधी-कधी सामन्याची स्थिती सुद्धा समजून घेतली पाहिजे. आपल्या जबाबदारीचा विचार केला पाहिजे. चांगल्या चेंडूंना आदर दिला पाहिजे. परिस्थितीनुसार फटक्यांची निवड गरजेची असते. ऋषभ पंतने हीच गोष्ट केली नाही. अन्यथा तो संकटमोचक ठरला असता. परिणामी भारताला कमी धावसंख्येवर वेस्ट इंडिजला रोखता आलं.