India vs West Indies 3rd T20 ची वेळ बदलली, जाणून घ्या कधी सुरु होणार सामना?
India vs West Indies 3rd T20: भारत आणि वेस्ट इंडिज मधील तिसऱ्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे.
मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज मधील तिसऱ्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे. या सामन्याचा टॉस आता 8 ऐवजी 9 वाजता होणार आहे. म्हणजे मॅच मधील पहिला चेंडू रात्री 9.30 वाजता टाकला जाईल. भारतीय वेळेनुसार, रात्री 9.30 वाजता सामना सुरु होईल. तिसऱ्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या वेळेत झालेल्या बदलाबद्दल BCCI कडून माहिती देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने टि्वट करुन सामन्याच्या वेळेत झालेल्या बदलाबद्दल माहिती दिली. खेळाडूंना आराम मिळावा, या हेतुने तिसऱ्या टी 20 सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये दुसरा टी 20 सामना उशिराने सुरु झाला होता. भारतीय वेळेनुसार, रात्री उशिरा हा सामना संपला. खेळाडूंना फार थकवा जाणवू नये, यासाठी तिसऱ्या टी 20 सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
मॅचच्या वेळेबद्दल बीसीसीआयकडून टि्वट
BCCI ने टि्वट करुन तिसऱ्या टी 20 सामन्याच्या वेळेबद्दल माहिती दिली आहे. तिसऱ्या टी 20 सामन्याचा टॉस भारतीय वेळेनुसार, रात्री 9 वाजता होईल. मॅचची सुरुवात 9.30 वाजता होणार आहे.
वेळेतील बदलावर दोन्ही टीम्स सहमत
संघाचं सामान वेळेवर न पोहोचल्यामुळे दुसरा टी 20 सामनाही उशिराने सुरु झाला होता. दोन्ही संघ तिसरा टी 20 सामना उशिराने सुरु करण्यावर सहमत आहेत. खेळाडूंना आराम मिळावा, हा त्यामागे हेतू आहे. हा निर्णय घेण्याआधी फ्लोरिडा मध्ये होणाऱ्या सलग दोन सामन्यांबद्दलही विचार करण्यात आला आहे.
? UPDATE ?
Revised timing for the 3rd #WIvIND T20I at St Kitts on August 02, 2022:
Toss: 9:00 PM IST (11:30 AM Local Time)
Start of play: 9:30 PM IST (12 PM Local Time) #TeamIndia
— BCCI (@BCCI) August 2, 2022
फ्लोरिडा मध्ये होणार शेवटचे दोन सामने
शेवटचे दोन सामने फ्लोरिडा मध्ये होणार, हे क्रिकेट वेस्ट इंडिजच्या विधानावरुन स्पष्ट झालय. अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यात अडचणी येत असल्याने, हे सामने दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतात अशी चर्चा होती. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. भारताने पहिला टी 20 सामना 68 धावांनी जिंकला.