IND vs WI: पहिल्या T 20 सामन्यात आधी भारताकडून पराभव नंतर वेस्ट इंडिजला दुसरा झटका

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा खिसा रिकामा झाला आहे. प्रत्यक्षात असं घडलेलं नाही, पण मैदानावरील त्यांच्या एका चुकीचा हा परिणाम आहे.

IND vs WI: पहिल्या T 20 सामन्यात आधी भारताकडून पराभव नंतर वेस्ट इंडिजला दुसरा झटका
IND vs WI Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 1:38 PM

मुंबई: वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा खिसा रिकामा झाला आहे. प्रत्यक्षात असं घडलेलं नाही, पण मैदानावरील त्यांच्या एका चुकीचा हा परिणाम आहे. भारताविरुद्ध पहिल्या टी 20 मॅच मध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला पराभवाचा सामना करावाच लागला. पण त्याचवेळी स्लो ओव्हर रेटमुळे त्यांच्या टीमला दंडही ठोठावण्यात आला. म्हणजे एकाचवेळी दुहेरी नुकसान. आधी पराभव नंतर दंड.

निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्या मॅच फी मधून 20 टक्के रक्कम कापण्यात आली. मॅच रेफ्री रिची रिचर्डसन यांनी त्रिनिदाद मधील पहिल्या टी 20 सामन्यानंतर वेस्ट इंडिज संघावर ही कारवाई केली आहे. ICC कोड ऑफ कंडक्ट नुसार कलम 2.22 मध्ये संघ स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला, तर मॅच फी मधून 20 टक्के रक्कम कापून घेण्यात येते.

निकोलस पूरनने चूक मान्य केली

स्लो ओव्हर रेट साठी वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोलस पूरनने आपली चूक मान्य केली आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणीची गरज नाहीय.

दिनेश कार्तिक या विजयाचा हिरो

वनडे सीरीज मध्ये वेस्ट इंडिजला 3-0 अशी धूळ चारल्यानंतर टीम इंडियाने पहिल्या टी 20 सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. भारताने त्रिनिदाद मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिज वर 68 धावांनी मोठा विजय मिळवला. दिनेश कार्तिक या विजयाचा हिरो ठरला. त्याने आपल्या तुफानी फलंदाजीच्या बळावर सामन्याची दिशाच बदलून टाकली. दिनेश कार्तिकने अवघ्या 19 चेंडूत नाबाद 41 धावा फटकावल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

दिनेश कार्तिकची स्फोटक फलंदाजी

दिनेश कार्तिकने आपल्या 19 चेंडूंच्या इनिंग मध्ये वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. स्ट्राइक रेट 215 च्या पुढे होता. दिनेश कार्तिकने जोरदार हिटिंग केली. हे शॉट्स पाहिल्यानंतर कार्तिक चेंडूच्या कानाखाली वाजवतोय, असं वाटत होतं. कार्तिकची फलंदाजीच तशी होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.