हा धडाकेबाज क्रिकेटर भाजपमध्ये प्रवेश करणार? या जागेवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता
Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपमध्ये इनकमिंग सुरु आहे. अब की बार ४०० पारचा नारा दिल्यानंतर त्याला सत्यात उतरवण्यासाठी भाजपकडून तयारी सुरु आहे. त्यासाठी भाजपने अनेक स्टार चेहऱ्यांना संधी देऊ शकते.
Loksabha election 2o24 : लोकसभा निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सगळेच पक्ष कामाला लागले आहे. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी सगळेच पक्ष प्रयत्न करत आहेत. भाजपने यंदा अब की बार ४०० पारचा नारा दिला आहे. त्यामुळे ४०० जागा कशा जिंकता येतील यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. ४०० चा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून अनेक मोठ्या सेलिब्रिटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं. ज्यामध्ये अभिनेते आणि अभिनेत्रींचा समावेश आहे. पण यासोबत एका क्रिकेटरच्या नावाची देखील चर्चा आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणार हा क्रिकेटर?
क्रिकेटपटू युवराज सिंग भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतो अशी चर्चा आहे. त्याला भाजप गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जावू शकते. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सध्या अभिनेता सनी देओल गुरुदासपूर मतदारसंघातून खासदार आहे. येथून पुन्हा निवडणूक लढवण्यास त्यांनी नकार दिला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये आपला टक्कर देण्यासाठी भाजप युवराज सिंगला भाजपात आणू शकते. निवडणुकीआधी अनेक जण वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. कोणी पक्ष बदलत आहेत तर कोणी नव्याने सुरुवात करत आहेत.
आणखी काय सुरुये चर्चा
पंजाब काँग्रेसचे माजी नेते नवज्योतसिंग सिद्धू हे भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करू शकतात, अशी देखील चर्चा होती. पण याला सिद्धू यांनी याचा पूर्णपणे इन्कार दिला होता. आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग भाजपमध्ये प्रवेश करू शकतो परंतु क्रिकेटपटूने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.
लोकसभा निवडणुकीपूर्वी युवराज भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता सनी देओलने गुरुदासपूरमधून निवडणूक लढवली होती आणि विजयी झाला होता. देओल यापुढे या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत, त्यामुळे भाजपने गुरुदासपूरसाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केला आहे. याधी खासदार मनीष तिवारीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.