WIPL Team Auctions : महिला IPL च्या टीमची प्राइस ते BCCI ला किती हजार कोटी मिळणार? जाणून घ्या 10 मोठ्या गोष्टी
WIPL Team Auctions : बीसीसीआय मुंबईमध्ये आयपीएल टीम्सच ऑक्शन करणार आहे. एकूण 17 कंपन्या या शर्यतीत आहेत. या कंपन्यांमध्ये 7 आयपीएल फ्रेंचायजी आहेत.
WIPL Team Auctions : महिला आयपीएलसाठी 25 जानेवारी मोठा दिवस आहे. आज या लीगला पाच फ्रेंचायजी मिळणार आहेत. बीसीसीआय मुंबईमध्ये आयपीएल टीम्सच ऑक्शन करणार आहे. एकूण 17 कंपन्या या शर्यतीत आहेत. या कंपन्यांमध्ये 7 आयपीएल फ्रेंचायजी आहेत. महिला आयपीएल टीम्सच्या लिलावामुळे बीसीसीआयच्या तिजोरीत आणखी भर पडणार आहे. या लिलावतून बीसीसीआयच्या तिजोरीत 4 हजार कोटी रुपये जमा होऊ शकतात. WIPL चा लिलाव आणि या लीगशी संबंधित 10 गोष्टी जाणून घेऊया.
- WIPL टीम्स खरेदी करण्यासाठी 30 पेक्षा जास्तच टीम्सनी पाच कोटी रुपयांच्या बोलीची कागदपत्र विकत घेतली होती. यात 7 आयपीएल टीम्स आहेत.
- WIPL टीम्सच्या ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, पंजाब किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स या टीम्स आहेत.
- अदानी ग्रुप, कॅप्री ग्लोबल, हल्दीराम ग्रुप, टॉरेंट फार्मा, अपोलो पाइप्स सारख्या कंपन्या सुद्धा महिला आयपीएल टीम्स विकत घेण्याच्या शर्यतीत आहेत.
- WIPLची एक टीम 500 ते 600 कोटीमध्ये विकली जाऊ शकते. टीम खरेदी करणाऱ्या कंपनीची नेटवर्थ 1 हजार कोटी रुपयांच्या घरात असली पाहिजे.
- महिला आयपीएल टीम ऑक्शनमध्ये कंपनीला एकापेक्षा जास्त शहरांच्या टीम्सवर बोली लावता येईल. कुठल्याही टीमची कुठलीही बेस प्राइस नाहीय. जी कंपनी जिंकेल, त्यांना 10 वर्षांसाठी फ्रेंचायजी मालकी हक्क मिळतील.
- महिला आयपीएल टीम्सना आपला स्क्वाड बनवण्यासाठी 12 कोटी रुपयाची पर्स मनी मिळेल. लिलाव कधी होणार? त्याची तारीख ठरलेली नाही. पण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लिलाव होऊ शकतो.
- महिला आयपीएलच्या प्रत्येक टीमच्या स्क्वाडमध्ये 7 परदेशी खेळाडू असतील. स्क्वाडमध्ये एकूण 15 ते 18 खेळाडू आहेत.
- महिला आयपीएलच आयोजन टी 20 वर्ल्ड कपनंतर मार्चमध्ये होईल. पहिल्या सीजनमध्ये 22 सामने खेळले जातील.पुरुष आयपीएल सुरु होण्याआधी फायनल होईल. सीजनमध्ये सर्व सामने एकाच शहरात आयोजित होऊ शकतात. पहिल्य़ा महिला आयपीएलच आयोजन मुंबईत होऊ शकतं.
- महिला आयपीएल खेळण्यासाठी इच्छुक असलेले खेळाडू 26 जानेवारीपर्यंत आपलं नाव रजिस्टर करु शकतात. सॅलरी कॅपमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंना तीन प्राइस कॅटेगरीत ठेवण्यात आलय. हे खेळाडू 50 लाख, 40 लाख आणि 30 लाखाच्या कॅटेगरीत आहेत.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला आयपीएलच विजेतेपद मिळवणाऱ्या टीमला 12 कोटी रुपयांच इनाम मिळेल. फायनलमध्ये पोहोचणाऱ्या टीमला 3 कोटी रुपये मिळू शकतात.
Non Stop LIVE Update