AUSW vs INDW, 1st ODI: भारतीय महिलांना नमवत ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास, असा विक्रम करणारा पहिलाच महिला संघ
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) महिला क्रिकेट संघामध्ये आजपासून (21 सप्टेंबर) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. पण पहिल्याच सामन्यात भारतीय महिलांना लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. याठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. पण या दौऱ्याची सुरुवातच भारतीय महिलांना पराभवाने करावी लागली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ तब्बल 9 विकेट्सच्या मोठ्या फरकाने पराभूत झाला आहे. त्यामुले तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 ची आघाडी घेतली आहे. याचवेळी ऑस्ट्रेलियन महिलांनी एक नवा विक्रमही स्वत:च्या नावे केला आहे.
सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी निवडली. अशावेळी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाती मिताली राज सोडता एकाही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारतीय टीमने 50 ओव्हवरमध्ये केवळ 225 धावा केल्या. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाने केवळ एक विकेट गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं आणि सामना जिंकला. विशेष म्हणजे ऑस्ट्रलियन महिलांचा एकदिवसीय सामन्यांतील हा सलग 25 वा विजय असल्याने त्यांच्यासाठी ही एक मोठी गोष्ट आहे. तसंच अशी कामगिरी करणारा हा पहिलाच महिला संघ आहे.
The winning streak goes on and on and on…
A 25th straight ODI win for @AusWomenCricket as they beat India by nine wickets in the #AUSvIND series opener.
Scorecard ? https://t.co/pH8bEtSJHw pic.twitter.com/73LqkkUumI
— ICC (@ICC) September 21, 2021
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांकडून भारतीय संघाची धुलाई
ऑस्ट्रेलियाकडून सलामीला आलेल्या रेचल हेन्स आणि एलिसा हीली यांनी पहिल्या विकेटसाठी 126 धावांची शानदार भागिदारी रचली. त्यानंतर 77 चेंडूत 77 धावा बनवत हीली ला पूनम यादवने (Poonam Yadav) बाद केलं. हीलीने 8 चौकार आणि दोन षटकार लगावले होते. त्यानंतर कर्णधार मेग लेनिंगने रेचलसोबत विजय पक्का केला. यावेळी मेगने नाबात 53 आणि रेचलने नाबाद 93 धावा केल्या.
मितालीची एकाकी झुंज व्यर्थ
भारताकडून कर्णधार मिताली राजशिवाय एकाही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय महिलांमध्ये कोणालाच मोठा स्कोर उभा करता आला नाही. ज्यामुळे भारत केवळ 225 धावाच स्कोरबोर्डवर लावू शकला. यावेळी मिताली राजने कारकिर्दीतील 59 वे अर्धशतक लगावत 107 चेंडूच 61 धावा केल्या. ज्यात तीन चौकार सामिल होते. मितालीसह पदार्पण करणाऱ्या यास्तिका भाटियाने 51 चेंडूत 35 आणि ऋचा घोषने 29 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या.
हे ही वाचा :
तालिबानकडून IPL बॅन, चिअर लीडर्स डोळ्यात खुपतात? अफगाणिस्तानमध्ये आयपीएलचे ढोल थंडच
या 2 खेळाडूंमुळे मुंबईचा पराभव करु शकलो, विजयानंतर MS धोनीची प्रतिक्रिया
(With beating indian women cricket team australian women won consecutive 25th ODI)