महिला IPL संदर्भात BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची मोठी घोषणा

मागच्या 14 वर्षात आयपीएलमधून अनेक नवीन प्रतिभावान खेळाडूंनी टीम इंडियात स्वत:च स्थान निर्माण केलं. जागतिक क्रिकेटमध्ये आज आयपीएलच दबदबा आहे.

महिला IPL संदर्भात BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची मोठी घोषणा
(Photo: File/BCCI)
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 4:45 PM

मुंबई: आज भारतीय पुरुष क्रिकेट संघाने जी उंची गाठलीय, त्यात इंडियन प्रिमियर लीग स्पर्धेचही (IPL) योगदान आहे. IPL मधून अनेक नवीन प्रतिभावान खेळाडू समोर आले. मागच्या 14 वर्षात आयपीएलमधून अनेक नवीन प्रतिभावान खेळाडूंनी टीम इंडियात स्वत:च स्थान निर्माण केलं. जागतिक क्रिकेटमध्ये आज आयपीएलच दबदबा आहे. अन्य देशांमध्ये सुद्धा टी-20 लीग स्पर्धा होतात. पण त्यांना आयपीएलची सर नाहीय. पुरुषांप्रमाणेच महिलांसाठी सुद्धा आयपीएल स्पर्धा (Women IPL) सुरु करण्याची मागणी होत आहे. पण भारतीय क्रिकेट बोर्ड वेगवेगळी कारणं सांगून महिला स्पर्धेच्या आयोजनाचा विषय टाळत होता. आता BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्वत:च महिला आयपीएल संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. बोर्डाचा 2023 पासून महिला आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा विचार सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं.

भारतीय क्रिकेट बोर्डाने आयपीएल स्पर्धा यशस्वी करुन दाखवली असली, तरी मागच्या 15 वर्षात महिला टी-20 लीग स्पर्धा सुरु करता आलेली नाहीय. याउलट ऑस्ट्रेलिया महिला बीग बॅश लीग आणि इंग्लंड टी-20 ब्लास्ट आणि द हंड्रेड सारख्या स्पर्धा सुरु आहेत. भारतातील महिला क्रिकेटपटुंनीही आयपीएल सारखी स्पर्धा सुरु करण्याची मागणी केली होती. बीसीसीआयने आयपीएल सोबत महिला टी20 चॅलेंज स्पर्धा सुरु केली.

2023 मध्ये पुरुष आय़पीएल सारखीच स्पर्धा महिला क्रिकेटबद्दलच्या या दृष्टीकोनावरुन बीसीसीआय आणि विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीवरही बरीच टीका झाली आहे. बोर्ड सध्या महिला आयपीएल स्पर्धेची तयारी करत आहे. 2023 मध्ये पुरुष आयपीएलसारखीच स्पर्धा आयोजित केली जाईल. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने ही माहिती दिली. गांगुलीच्या विधानावरुन गदारोळ गांगुलीने अलीकडेच एका मुलाखतीत बोर्डाला महिला आयपीएल स्पर्धा सुरु करायची आहे. पण त्यासाठी तितक्यात प्रमाणात महिला क्रिकेटपटुंची गरज आहे, असं विधान केलं होतं. गांगुलीच्या या विधानावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.