T20 WC : 90 दिवस मृत्यूशी झुंज, आत्महत्येचा प्रयत्न, दक्षिण आफ्रिकेच्या झुंजार क्रिकेटरची प्रेरणादायी गोष्ट
T20 WC : ब्रिट्सने या वर्ल्ड कपमध्ये केलेली कमाल सगळ्या जगाने पाहिली आहे. पण काही वर्षांपूर्वी तिने खूप खडतर काळ पाहिला. आयुष्यातला तो टप्पा पार करुन ती इथवर पोहोचली आहे. या बद्दल फार कमी जणांना माहित असेल.
T20 Womens World cup Final : 90 दिवस तिची मृत्यूशी झुंज सुरु होती. रुग्णालयातील लढाई ती जिंकली. पण स्वत:सोबत हरली. तिने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. एकदा नाही, तर कित्येकवेळा तिने हा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या आयुष्याच चमत्कार घडला. ती स्वत:च्या पायावर उभी राहिली. आयुष्य जगण्याची उमेद तिच्यात निर्माण झाली. आता लाखो लोकांना तिच्याकडून अपेक्षा आहे. रविवारी संपूर्ण क्रिकेट विश्वाच लक्ष टॅजमिन ब्रिट्सवर असेल. तिच्या कामगिरीमुळेच दक्षिण आफ्रिकेच्या टीमने महिला T20 वर्ल्ड कपची फायनल गाठली. क्रिकेट इतिहासात वर्ल्ड कपची फायनल गाठणारी ही दक्षिण आफ्रिकेची पहिली टीम ठरली आहे.सेमीफायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 6 धावांनी पराभूत केलं. या ऐतिहासिक विजयात ब्रिट्सने सर्वाधिक 68 धावा केल्या. आता फायनलमध्ये लाखो लोकांना तिच्याकडून पुन्हा अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
एका घटनेमुळे आयुष्य बदललं
ब्रिट्सने या वर्ल्ड कपमध्ये केलेली कमाल सगळ्या जगाने पाहिली आहे. पण काही वर्षांपूर्वी तिने खूप खडतर काळ पाहिला. आयुष्यातला तो टप्पा पार करुन ती इथवर पोहोचली आहे. या बद्दल फार कमी जणांना माहित असेल. आज ती बॅटने कमाल दाखवतेय. पण बॅट्समन बनण्याच तिच स्वप्न नव्हतं. तिला जॅवलिन थ्रोअर बनायचं होतं. ती ऑलिम्पिकसाठी सुद्धा पात्र ठरली होती. ऑलिम्पिकच तिकीट मिळाल्याच सेलिब्रेशन सुरु होतं, त्याचवेळी घडलेल्या एका घटनेमुळे तिचं आयुष्य बदलून गेलं.
म्हणून तिने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला
वर्ष 2011 मध्ये ब्रिट्सच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर रुग्णालयात जवळपास 3 महिने तिची मृत्यूशी झुंज सुरु होती. तिने जगण्याची अपेक्षा सोडून दिली होती. या अपघातामुळे जॅवलिन थ्रोअर म्हणून लंडन ऑलिम्पिकमध्ये उतरण्याच तिचं स्वप्न मोडलं. तिच्या अनेक सर्जरी झाल्या. 2019 मध्ये तिने एका वेबसाइटला इंटरव्यू दिला. “पुन्हा कधी मी माझ्या पायावर चालू शकेन, असं मला वाटत नव्हतं” असं ब्रिट्सने या मुलाखतीत सांगितलं. आयुष्याला दिशा राहिली नाही, असं तिला वाटत होतं. त्यामुळे तिने अनेकदा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. आयुष्य नव्याने सुरु करण्याची मिळाली उमेद
दरम्यानच्या काळात ब्रिटसची माजी क्रिकेटर फ्रेंकोइस वॅन डेर मेर्वे यांच्याबरोबर ओळख झाली. ते नामीबियाच्या महिला टीमचे कोच आहेत. डेर मर्वे ब्रिट्सचे मार्गदर्शक बनले. त्यांनी ब्रिट्सला आयुष्य पुन्हा नव्याने सुरु करण्याची उमेद दिली. त्यानंतर ब्रिट्सने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केला. आता ती क्रिकेटच्या एका मोठ्या लेव्हलवर दक्षिण आफ्रिकेच आशास्थान बनलीय.