WPL 2023, RCB vs GG | सोफी डेव्हाईनचा झंझावात, गुजरात जायंट्सवर 8 विकेट्सने मात
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात जायंट्सवर 8 विकेटसने धमाकेदार विजय मिळवला आहे. आरसीबीने 189 धावांच विजयी आव्हान हे 27 बॉल राखून आणि 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत आज शनिवारी 18 मार्च रोजी डबल हेडर सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या डबल हेडरमधील दुसऱ्या समान्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात जायंट्सवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. गुजरातने विजयासाठी दिलेल्या 189 धावांच मजबूत आव्हान हे आरसीबीने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 15.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. सोफी डेव्हाईन ही आरसीबीच्या विजयाची शिल्पकार ठरली. तसेच आरसीबीचा हा या मोसमातील सलग दुसरा विजय ठरला.
आरसीबीकडून सोफी डेव्हाईन हीने सर्वाधिक 99 धावांची खेळी केली. अवघ्या एका धावेने तिचं शतक हुकलं. मात्र तिच्या या खेळीनेच आरसीबीच्या विजयाचा पाया रचला. सोफीने फक्त 36 बॉलमध्ये 9 चौकार आणि 8 अफलातून सिक्सच्या जोरावर ही खेळी केली. कॅप्टन स्मृती मंधाना हीने 37 धावांचं योगदान दिलं. तर एलिसा पेरी आणि हेदर नाईट या दोघींनी आरसीबीला विजयापर्यंत पोहचवलं. एलिसाने नाबाद 19 आणि नाईटने 22 रन्स केल्या. गुजरातकडून किम गर्थ आणि कॅप्टन स्नेह राणा या दोघींनी 1-1 विकेट घेतली.
आरसीबीचा सलग दुसरा विजय
Make that TWO wins in a row for @RCBTweets ??
A special chase and an emphatic victory ??
Scorecard ▶️ https://t.co/uTxwwRnRxl#TATAWPL | #RCBvGG pic.twitter.com/xSgr1lhYbS
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 18, 2023
त्याआधी गुजरातने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 4 आऊट 188 धावा केल्या. गुजरातकडून लॉरा वोल्वार्ड हीने 68, अॅशलेग गार्डनर 41, सभिनेनी मेघना 31, हेमलथा आणि सोफिया डंकले या दोघींनी प्रत्येकी 16* आणि हर्लीन देओल ही नाबाद 12 रन्स केल्या. आरसीबीकडून श्रेयांका पाटील हीने 2 विकेट्स घेतल्या.तर सोफी डेव्हाईन आणि प्रीती बोस हीने 1-1 विकेट घेतली.
पहिल्या सामन्यात काय झालं?
दरम्यान त्याआधी आजच्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. यूपीने मुंबई इंडियन्स्या विजयी घोडदौडीला ब्रेक लावला. यूपीने मुंबईवर 5 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईचा हा या मोसमातील पहिला पराभव ठरला. मात्र याचा फरक मुंबईला पडणार नाही, कारण पलटणने आधीच क्वालिफाय केलं आहे.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | स्मृती मंधाना (कॅप्टन), सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, हीदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, दिशा कासट, मेगन शुट, आशा शोबाना आणि प्रीती बोस.
गुजरात जायंट्स | स्नेह राणा (कर्णधार), सोफिया डंकले, लॉरा वोल्वार्ड, हरलीन देओल, अॅशलेग गार्डनर, दयालन हेमलता, सभिनेनी मेघना, सुषमा वर्मा (wk), किम गर्थ, तनुजा कंवर आणि अश्विनी कुमारी.