Supernovas vs Trailblazers: 6 चेंडूत 26 धावा कुटणाऱ्या डिएंड्रा डॉटिनचा शर्मिनच्या बुलेट थ्रो ने संपवला खेळ, एकदा VIDEO बघा

Supernovas vs Trailblazers: पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियवर ही मॅच सुरु आहे. सुपरनोवाज टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुपरनोवाजने प्रथम फलंदाजी करताना 163 धावा केल्या आहेत.

Supernovas vs Trailblazers: 6 चेंडूत 26 धावा कुटणाऱ्या  डिएंड्रा डॉटिनचा शर्मिनच्या बुलेट थ्रो ने संपवला खेळ, एकदा VIDEO बघा
Deandra Dottin runout Image Credit source: bcci
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 9:50 PM

मुंबई: IPL 2022 मध्ये उद्यापासून प्लेऑफचे सामने सुरु होणार असताना आजपासून वुमेन्स टी 20 चॅलेंज (Women’s T20 Challenge) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सुपरनोवाज आणि ट्रेलब्लेजर्समध्ये (Supernovas vs Trailblazers) आज पहिला सामना सुरु आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियवर ही मॅच सुरु आहे. सुपरनोवाज टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुपरनोवाजने प्रथम फलंदाजी करताना 163 धावा केल्या आहेत. प्रिया पुनिया (22) आणि डिएंड्रा डॉटिनने आज चांगली सुरुवात करुन दिली. पाच ओव्हर्समध्ये दोघींनी धावफलकावर 50 धावा लावल्या होत्या. पण एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शर्मिन अख्तरने केलेल्या अचूक बुलेट थ्रो वर डिएंड्रा डॉटिन रनआऊट झाली. तिने 17 चेंडूत 32 धावा कुटल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता.

फटकेबाजी करणाऱ्या डिएंड्रा डॉटिनचा खेळ संपवणारा शर्मिन अख्तरचा बुलेट थ्रो इथे क्लिक करुन बघा

हरलीन-हरमनप्रीतची महत्त्वपूर्ण भागीदारी

दोन्ही सलामीवीर तंबूत परतल्यानंतर हरलीन देओल आणि कॅप्टन हरमनप्रीत कौरने महत्त्वपूर्ण भागीदारी केली. हरलीनने फटकेबाजी करताना 19 चेंडूत 35 धावा फटकावल्या. याक पाच चौकार आहेत. हरमनप्रीत 37 धावांवर रनआऊट झाली. 29 चेंडूत 37 धावांची खेळी करणाऱ्या हरमनप्रीतने चार चौकार लगावले. हरमनप्रीत 19 व्या षटकापर्यंत खेळपट्टीवर होती. सुपरनोवाजने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 163 धावा केल्या. 2020 मध्ये झालेली स्पर्धा ट्रेलब्लेजर्सने जिंकली होती.

डिएंड्रा डॉटिनची फटकेबाजी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

भारताच्या प्रमुख क्रिकेटपटू नाहीत

टी 20 चॅलेंज स्पर्धेत भारताची अनुभवी क्रिकेटपटू मिताली राज, झूलम गोस्वामी आणि शिखा पांडेला स्थान मिळालेलं नाही. यंदाची स्पर्धा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या खेळाडूंशिवाय खेळली जात आहे.

सुपरनोवाज प्लेइंग 11 – हरमनप्रीत कौर (कॅप्टन), डिएंड्रा डॉटिन, प्रिया पूनिया, सुने लूस, हरलीन देओल, तानिया भाटिया, सोफी एक्लेस्टोन, एलेना किंग, वी चंदू, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह,

ट्रेलब्लेजर्स प्लेइंग 11 – स्मृती मांधना (कॅप्टन), जेमिमाह रॉड्रिग्स, पूनम यादव, हॅली मॅथ्यूज, सोफी डंकली, राजेश्वरी गायकवाड, अरुंधती रेड्डी, सलमा खातून, रेणुका सिंह, ऋचा घोष, शर्मिन अख्तर,

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.