महिला टी20 विश्व कप : कोण आहे रेणुका सिंह? जिने हरलेल्या मॅचमध्ये भारतासाठी केली कमाल

Womens T20 WC : वेगवान बॉलर रेणुकाने आपल्या गोलंदाजीने कमाल केली. रेणुकाने आपल्या चार ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त 15 धावा देऊन पाच विकेट काढल्या. पहिल्या तीन विकेट रेणुकाने काढल्या.

महिला टी20 विश्व कप : कोण आहे रेणुका सिंह? जिने हरलेल्या मॅचमध्ये भारतासाठी केली कमाल
Renuka singh
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 10:30 AM

Womens T20 WC : ICC महिला T20 वर्ल्ड कप 2023 टुर्नामेंट सुरु आहे. भारतीय महिला टीमचा शनिवारी इंग्लंडने 11 धावांनी पराभव केला. टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. इंग्लंडकडून टीम इंडियाचा भले पराभव झाला, पण वेगवान बॉलर रेणुकाने आपल्या गोलंदाजीने कमाल केली. रेणुकाने आपल्या चार ओव्हरच्या स्पेलमध्ये फक्त 15 धावा देऊन पाच विकेट काढल्या. पहिल्या तीन विकेट रेणुकाने काढल्या. डावाच्या अखेरीस तिने सलग दोन विकेट काढल्या.

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी पाच विकेट घेणारी ती पहिली वेगवान गोलंदाज बनली आहे. तिच्याआधी प्रियंका रायने 2009 टी 20 वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी केली होती. पण ती फिरकी गोलंदाज होती.

पराभव टाळता आला नाही

रेणुकाने दमदार प्रदर्शन केलं. पण टीम इंडियाला आपला पराभव टाळता आला नाही. इंग्लंडने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 151 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय टीमने फक्त 140 धावा केल्या.

कोण आहे रेणुका सिंह?

रेणुका सिंह मूळची हिमाचल प्रदेशची आहे. क्रिकेटमध्ये करिअर बनवणं रेणुकासाठी बिलकुलही सोपं नव्हतं. बऱ्याच अडचणींचा सामना केल्यानंतर ती आज टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमध्ये खेळतेय. रेणुका अवघ्या तीन वर्षांची असताना, वडील केहर सिंह यांचं निधन झालं. लोकांकडून तिने जे ऐकलय, त्याच तिच्या वडिलांबद्दलच्या आठवणी आहेत.

रेणुकाच्या वडिलांना क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्यांच्याकाळात त्यांना विनोद कांबळीचा खेळ प्रचंड आवडायचा. त्यामुळेच रेणुकाच्या वडिलांनी मुलाच नाव विनोद ठेवलं होतं. रेणुकाने टेनिस बॉलपासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वयाच्या 13 व्या वर्षी क्रिकेटमध्ये करिअर बनवण्यासाठी ती घर सोडून धर्मशाळा येथे निघून गेली. क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी कोणी साथ दिली?

क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी रेणुकाला तिच्या काकांची भरपूर साथ मिळाली. धर्मशाळामध्ये तिने कोच पवन सेन यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले. रेणुकाला सर्वप्रथम चॅलेंजर ट्रॉफीमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली. यात तिने 21 विकेट काढल्या. त्यानंतर तिला इंडिया ए टीममध्ये संधी मिळाली. रेणुकाने त्यानंतर भारताच्या सीनियर टीममध्ये प्रवेश केला.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.