भारताने सेमीफायनल, फायनलचे मुंबईत किती सामने जिंकलेत? संजय राऊत यांच्या दाव्यात किती तथ्य?

World cup final 2023 | वर्ल्ड कप फायनल अहमदाबादऐवजी मुंबईत खेळवायला हवी होती, अशी चर्चा सोशल मीडियानवर सुरु आहे. अहमदाबाद अनलकी आणि मुंबई लकी असा सूर या चर्चेचा आहे. पण आतापर्यंत टीम इंडियाचे वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल, फायनलचे किती सामने मुंबईत झालेत? त्यापैकी किती जिंकले? यावर एक नजर मारा.

भारताने सेमीफायनल, फायनलचे मुंबईत किती सामने जिंकलेत? संजय राऊत यांच्या दाव्यात किती तथ्य?
World cup 2023
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 10:21 AM

World cup final 2023 | सलग 10 सामने जिंकणारी टीम इंडिया फायनलमध्ये अडखळली. वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 6 विकेटने हरवलं. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक उंचावला. या पराभवामुळे पुन्हा एकदा टीम इंडियाच विश्वचषक जिंकण्याच स्वप्न अपूर्ण राहिलं. खराब खेळ हे टीम इंडियाच्या पराभवाच कारण आहे. पण देशात एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. अनेक मोठ्या नेत्यांचा दावा आहे की, अहमदाबादऐवजी मुंबई किंवा कोलकातामध्ये फायनल झाली असती, तर टीम इंडियाने किताब जिंकला असता.

वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना रविवारी 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी स्वीकारली. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना फक्त 240 धावाच केल्या. संपूर्ण टीम ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य फक्त 43 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून पार केलं.

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?

खराब खेळ हे टीम इंडियाच्या पराभवाच कारण आहे. पण भारतात यावरुन राजकारण सुरु झालं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, फायनल कोलकात किंवा मुंबईत असती, तर टीम इंडिया जरुर जिंकली असती. शिवसेना नेते संजय राऊत सुद्धा हेच म्हणाले, भारत-ऑस्ट्रेलिया फायनल अहमदाबादऐवजी मुंबईत झाली असती, तर टीम इंडिया चॅम्पियन बनली असती.

नॉकआऊट सामन्यांचा रेकॉर्ड काय सांगतो?

एखाद्या मैदानावर सामना खेळल्यामुळे किती फरक पडतो, हे सांगण कठीण आहे. पण इतिहासात तुम्ही डोकावू शकता. मागच्या 3-4 दशकात भारतात मोठ्या ICC स्पर्धांच आयोजन झालं आहे. सुरुवातीपासूनच मोठे सामने मुंबई, कोलकात्ता, दिल्ली आणि चेन्नई सारख्या शहरात खेळवले जायचे. ICC टुर्नामेंटसमधील नॉकआऊट सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला, तर भारताला कधी यश मिळालय, कधी अपयश.

1987 मध्ये वानखेडेवर काय झालेलं?

1987 मध्ये भारतात पहिल्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेत आयोजन झालं होतं. त्यावेळी भारत आणि इंग्लंडमध्ये सेमीफायनल मुकाबला झाला होता. वानखेडे स्टेडियमवर ही सेमीफायनलची मॅच होती. टीम इंडियाला त्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेला. त्यानंतर 1996 साली भारतात वनडे वर्ल्ड कपच आयोजन झालं. त्यावेळी श्रीलंकेविरुद्ध सेमीफायनलचा सामना होता. कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर ही मॅच झाली. त्यावेळी सुद्दा टीम इंडियाचा पराभव झालेला.

त्यावेळी अहमदाबादमध्ये जिंकलेलो

2006 साली भारतात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा झाली. त्यावेळी टीम इंडियाच आव्हान ग्रुप स्टेजमध्येच संपलं होतं. 2011 मध्ये भारतात पुन्हा वनडे वर्ल्ड कप झाला. त्यावेळी टीम इंडिया चॅम्पियन बनली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर फायनलचा सामना झाला. टीम इंडियाने श्रीलंकेला नमवून फायनल जिंकली. त्याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अहमदाबादमध्ये क्वार्टर फायनलचा सामना खेळला गेला. ती मॅच जिंकून टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली होती.

T20 वर्ल्ड कप वानखेडेवर सेमीफायनलमध्ये काय झालेलं?

2016 साली T20 वर्ल्ड कप झाला. भारत यजमान होता. टीम इंडियाचा तेव्हा सुद्धा सेमीफायनलमध्येच पराभव झाला होता. वानखेडेवर झालेल्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजने हरवलं होतं. आता 2023 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.