World cup 2023 : तर टीम इंडियाला विजय घोषित करण्यात येईल
World cup 2023 : टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली आहे. टीम इंडियाचा सामना आता दुसऱ्या सेमीफायनलमधील विजयी संघासोबत होणार आहे. पण त्याआधी आयसीसीने महत्त्वाची घोषणा केली आहे.
World cup 2023 Final : विश्वचषक 2023 आता अंतिम टप्प्यात आहे. भारताने सेमीफायनल जिंकत फायनलमध्ये धडक दिली आहे. तर आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी सेमीफायनल रंगणार आहे. कोलकाता येथील ईडन गार्डनवर हा सामना होणार आहे. जो संघ आज जिंकेल तर फायनलमध्ये भारतासोबत भिडणार आहे. पण जर वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय होईल याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सामना रद्द झाला तर काय होईल
वर्ल्डकप २०२३ ची फायलन 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. पण सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि सामना रद्द होण्याची परिस्थिती निर्माण झाली, तर चाहत्यांनी घाबरण्याची गरज नाही. कारण आयसीसीने अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद असल्याचे जाहीर केले होते. अशा परिस्थितीत 19 नोव्हेंबरला पाऊस पडला तर 20 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.
या स्थितीत भारत ठरेल विश्वचषक विजेता
जर 20 नोव्हेंबरला म्हणजेच राखीव दिवशी पावसाने व्यत्यय आणला आणि सामना मध्येच थांबवावा लागला, तर भारताला 2023 चा विश्वचषक विजेता घोषित केले जाईल. याचे कारण भारताने साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना पराभूत केले होते. टीम इंडिया लीग स्टेजमध्ये टेबल टॉपर होती. त्यामुळे राखीव दिवशीही पाऊस पडला तर भारतीय संघ चॅम्पियन होईल.
सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय
भारताने पराभवाचा वचपा काढला आहे. टीम इंडियानं सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. भारतानं न्यूझीलंडला 398 धावांचे टार्गेट दिले होते. पण न्यूझीलंडची संपूर्ण इनिंग 48.5 ओव्हर्समध्ये 327 धावांवर संपुष्टात आली.
मोहम्मद शमीच्या 7 विकेट्स
एकाच सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा शमीने तिसऱ्यांदा पराक्रम केला आहे. त्याने सेमीफायलनमध्ये ७ विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध दोन वेळा त्याने ही कामगिरी केली आहे. तर वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात 50 विकेट्स घेणारा शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.