वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन हॉटेलमध्ये पोहचल्यावर टीम इंडियाला मिळाले सरप्राइज…
T20 world Champion Team India Arrives Delhi: आयटीसी मौर्या हॉटेलचे एग्जिक्यूटिव शेफ शिवनीत पहोजा यांनी सांगितले की, भारतीय संघासाठी खास केक बनवण्यात आला. हा केक संघाच्या जर्सीच्या रंगाचा आहे. त्याची हायलाइट टी-20 ट्रॉफी आहे. खऱ्या ट्रॅफीसारखी ती दिसत आहे.
भारतीय क्रिकेट टीम टी-20 वर्ल्ड कप जिंगल्यानंतर गुरुवारी बारबाडोसवरुन नवी दिल्लीत दाखल झाले. भारतीय संघाचे विमानतळावरच जल्लोषात स्वागत झाले. टीम इंडियाचे चाहत्यांनी विमानतळावर गर्दी केली होती. भारतीय संघ दाखल होताच इंडिया, इंडिया घोषणा चाहत्यांनी दिल्या. संघातील खेळाडूंना एका विशेष बसने विमानतळावरुन आटीसी मौर्या होटल (ITC Maurya) मध्ये नेण्यात आले. त्या ठिकाणीही भारतीय संघाच्या खेळाडूंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. संपूर्ण संघाला या ठिकाणी सरप्राइज देण्यात आले.
हॉटेलमध्ये असा मेनू
आयटीसी मौर्या हॉटेलचे एग्जिक्यूटिव शेफ शिवनीत पहोजा यांनी सांगितले की, भारतीय संघासाठी खास केक बनवण्यात आला. हा केक संघाच्या जर्सीच्या रंगाचा आहे. त्याची हायलाइट टी-20 ट्रॉफी आहे. खऱ्या ट्रॅफीसारखी ती दिसत आहे. चॉकलेटचा वापर करुन ती बनवण्यात आली आहे. भारतीय संघ मोठा प्रवास करुन परत आला आहे. त्यामुळे संघासाठी खास नाश्ता तयात करण्यात आला आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंना आवडणारे पदार्थ या नास्त्यामध्ये ठेवण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक खेळाडूची आवड लक्षात घेतली आहे. जसे छोले भटूरे…, मिलेट्सची अनेक डिश बनवली आहे.
#WATCH | Preparations underway at ITC Maurya to welcome Men's Indian Cricket Team, after winning the #T20WorldCup2024 trophy.
India defeated South Africa by 7 runs on June 29, in Barbados. pic.twitter.com/y4Ldw1kKVD
— ANI (@ANI) July 4, 2024
पीएम मोदी यांची टीम इंडिया भेट घेणार
भारतीय टीम गुरुवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्यासाठी भारतीय संघातील खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. त्यानंतर भारतीय संघ मुंबईसाठी रवाना होणार आहे. मुंबईत नरिमन पॉइंट ते वानखेड़े स्टेडियमपर्यंत खुल्या बसमधून भारतीय संघातील खेळाडूंची मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंत संध्याकाळी BCCI कडून 125 कोटी रुपयाचे परितोषिक टीम इंडियातील खेळाडूंना देण्यात येणार आहे.
टीम इंडियाचा कार्यक्रम असा
- 06:00 hrs: दिल्ली विमानतळावर आगमन
- 06:45 तास: ITC मौर्या, दिल्ली येथे आगमन
- 09:00 वाजता: ITC मौर्य येथून पंतप्रधान कार्यालयासाठी प्रस्थान
- 10:00 – 12:00 वाजता: पंतप्रधान कार्यालयात समारंभ
- 12:00 वाजता : ITC मौर्या साठी प्रस्थान
- दुपारी 12:30: ITC मौर्या येथून विमानतळासाठी प्रस्थान
- 14:00 वाजता: मुंबईसाठी प्रस्थान
- 16:00 तास: मुंबई विमानतळावर आगमन
- 17:00 वाजता: वानखेडे स्टेडियमवर आगमन
- 17:00 – 19:00 वाजता: खुल्या बसमधून विजयी मिरवणूक
- 19:00 – 19:30 वाजता: वानखेडे स्टेडियमवर छोटा समारंभ
- 19:30 वाजता: हॉटेल ताजसाठी प्रस्थान