WTC Final 2021 : बोलिंगसह बॅटचीही जादू, टीम साऊथीने सचिन तेंडुलकरपासून पॉन्टिगपर्यंत अनेकांना पछाडलं!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून भेदक गोलंदाजी करणाऱ्या टीम साऊथीने फलंदाजीतही मोठा विक्रम केलाय. त्याने सचिन तेंडुलकरपासून पॉन्टिगपर्यंत अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे.

WTC Final 2021 : बोलिंगसह बॅटचीही जादू, टीम साऊथीने सचिन तेंडुलकरपासून पॉन्टिगपर्यंत अनेकांना पछाडलं!
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 2:07 PM

साऊदम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) दोन्ही संघ तोडीस तोड खेळ करत आहेत. पावसाच्या व्यत्ययानंतरही सामना रंगतदार स्थितीत आहे. दरम्यान न्यूझीलंडच्या एका खेळाडूने अष्टपैलू कामगिरी केल्याने न्यूझीलंडला सामन्यात बराच फायदा झाला आहे. या खेळाडूचं नाव टीम साऊथी (Tim Southee). साऊथीने भारताच्या दुसऱ्या डावात सुरुवातीचे दोन महत्त्वाचे विकेट घेत 600 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. तर  न्यूझीलंडच्या पहिल्या डावात केलेल्या धमाकेदार 30 धावांच्या जोरावर कसोटी क्रिकेटमध्ये एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. जी सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिग, एबी डिव्हिलियर्ससारख्या दिग्गजांनाही जमली नाही. (World Test Championship Final 2021 tim Southee Completed 600 Wickets and on number of 15 in most sixes in test cricket )

टीमने भारताविरोधात पहिल्या डावात 46 बॉल्समध्ये 30 धावा केल्या. यामध्ये 2 षटकारही सामिल होते. त्यामुळे 79 कसोट्यांमध्ये 75 षटकार टीमच्या नावे झाल्याने तो कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार खेचणाऱ्यांत 15 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने विराट, सचिनसह अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. त्यात धोनीच्या नावावर 78 षटकार असल्याने टीम केवळ 4 षटकार मागे आहे धोनीचा रेकॉर्ड तोडण्यापासून.  दरम्यान या लिस्टमध्ये 107 षटकारांसह न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम पहिल्या स्थानी आहे. तर भारताकडून 91 षटकारांसह वीरेंद्र सेहवाग अव्वल स्थानी तर यादीत 5 व्या स्थानी आहे.

साऊथीचा 600 विकेट्सचा टप्पा पूर्ण

144 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये साऊथॅम्प्टन्या मैदानावर खेळली जाणारी ही इतिहासातली पहिलीच कसोटी चॅम्पियनशीप फायनल आहे. अशा महत्त्वाच्या सामन्यात साऊथीने क्लास परफॉर्मन्स दिलाय. त्याने शुबमनची विकेट घेऊन 600 विकेट्सचा टप्पा पूर्ण केलाय. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा केवळ दुसरा बोलर ठरला आहे. याअगोदर न्यूझीलंडकडून डॅनियल व्हिटोरीने 600 विकेट्स घेतल्या होत्या. व्हिटोरीने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 696 विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत तिसऱ्या नंबरवर आहेत सर रिटर्ड हेडली… त्यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत 589 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर ट्रेंट बोल्ट आहे, ज्याच्या नावावर 504 कसोटी विकेट आहेत.

हे ही वाचा :

WTC Final : ‘सुपरमॅन’ शुभमन, चित्त्यासारखी झेप घेत पकडला झेल, सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस

WTC Final : टॉवेल बांधून मैदानात उतरला मोहम्मद शमी, फोटो पाहून चाहते लोटपोट, म्हणाले सावरिया 2.0

WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!

(World Test Championship Final 2021 tim Southee Completed 600 Wickets and on number of 15 in most sixes in test cricket)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.