Harsha Bhogle : तिने मनातली गोष्ट बोलून दाखवली, हर्षा भोगलेंनी ‘ती’ इच्छा केली पूर्ण
WPL 2023 : 'ती' सामन्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये काय म्हणाली होती? हर्षा भोगले विसरले नाहीत. त्यांनी ती गोष्टी लक्षात ठेवली. दरम्यान युपी वॉरियर्झने दुसऱ्या सामन्यात तिला वगळून धक्कादायक निर्णय घेतला.
WPL 2023 : सध्या वूमेन्स प्रीमियर लीगचा पहिला सीजन सुरु आहे. बीसीसीआय आयोजित या टुर्नामेंटमध्ये जागतिक क्रिकेटमधील टॉप प्लेयर्स आपला सर्वोत्तम खेळ दाखवतायत. WPL मध्ये खेळणारी ऑस्ट्रेलियन बॅट्समन ग्रेस हॅरिसची प्रसिद्ध कॉमेंटेटर हर्ष भोगले यांनी एक इच्छा पूर्ण केली. ग्रेस हॅरिसने आधीच्या सामन्यात आक्रमक बॅटिंग करताना नाबाद 59 धावा केल्या होत्या. त्यावेळी तिने बर्गर खाण्याची इच्छा व्यक्त केली होती.
हर्षा भोगले यांनी तिची बर्गर खाण्याची इच्छा पूर्ण केली. युपी वॉरियर्झच्या पुढच्या सामन्यात बॅट्समन ग्रेस हॅरिसला बेंचवर बसवण्यात आलं. तिला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. त्यावेळी क्रिकेट पंडित हर्षा भोगले यांनी तिला बर्गर आणून देत तिची इच्छा पूर्ण केली.
तिच्यामुळे यूपीने जिंकला पहिला सामना
ग्रेस हॅरिसने WPL मधील आपला पहिला सामना खेळताना जबरदस्त प्रदर्शन केलं. तिने 26 चेंडूत 59 धावा चोपल्या. त्यामुळे यूपीच्या टीमला पहिला विजय मिळवता आला. तिला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. या मॅचनंतर प्रेस कॉन्फरसमध्ये ग्रेस हॅरिसने बर्गर खाण्याची इच्छा व्यक्त केली होती.
सर्वांसाठीच हा धक्कादायक निर्णय
“ड्रींक्स आणि बर्गर ठेवलेले असतात. मला बर्गर आवडतात. भारतात बर्गर कुठे मिळणार? ते मला माहित नाही” असं हॅरिस पहिल्या सामन्यानंतर म्हणाली होती. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात हॅरिसला बेंचवर बसवण्यात आलं. सर्वांसाठीच हा धक्कादायक निर्णय होता. तिच्या जागी शबनिम इस्माइलला संधी दिली. हर्षा भोगले हॅरिस काय बोलली ते विसरले नव्हते. ती डगआऊट एरियामध्ये असताना हर्षा भोगले तिच्याजवळ गेले व तिला तिचा आवडता बर्गर दिला.
Grace Harris mentioned her craving for a burger during the press conference in the last match, and Harsha surprised her with one today. Looks like she has become everyone’s favorite now. ?❤ pic.twitter.com/GDGV1gZvQu
— Shivani Shukla (@iShivani_Shukla) March 7, 2023
ग्रेस हॅरिसला चमचमीत पदार्थ खायला आवडतात. बर्गर तिला विशेष आवडतो. त्याशिवाय बटर चिकनही तिला पसंत आहे. गुजरात जायंट्स विरुद्धच्या तडाखेबंद खेळीनंतर भारतात बर्गर कुठे मिळणार? मला माहित नाही, असं ती म्हणाली होती. ग्रेस हॅरिसने गुजरात जायंट्स विरुद्ध्या सामन्यात तुफान बॅटिंग केली. 3 ओव्हरमध्ये विजयासाठी 58 धावांची आवश्यकता होती. तिने आक्रमक फलंदाजी केली, अॅनाबेली सदरलँडच्या लास्ट ओव्हरमध्ये 20 धावा लुटल्या आणि एक चेंडू राखून यूपीच्या टीमला विजय मिळवून दिला.