MI vs GG, WPL 2023 | हर्लीन देओलचा कडक थ्रो, हुमैरा काझी रन आऊट, व्हीडिओ व्हायरल
मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सवर वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील सामन्यात 55 धावांनी विजय मिळवला. मात्र त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती हर्लीन देओल हीच्या रॉकेट थ्रो ची.

मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील 12 व्या सामन्यात गुजरातचा जायंट्सचा पराभव झाला. मुंबई इंडियन्सने गुजरातवर 55 धावांच्या फरकाने मात केली. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 163 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र गुजरातला या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 107 धावाच करता आल्या. मुंबईचा या मोसमातील गुजरात विरुद्धचा दुसरा आणि सलग पाचवा विजय ठरला. दरम्यान या सामन्यातील एका असा व्हीडिओ आहे, ज्याची एकच चर्चा रंगलीय. तसेच हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
नक्की काय झालं?
मुंबई इंडियन्सच्या डावातील 18 व्या ओव्हरमध्ये कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि हुमायरा काजी या दोघी बॅटिंग करत होत्या. गुजरातकडून अन्नाबेल सदरलँड बॉलिंग करत होती. हरमनप्रीतने मिड ऑनच्या दिशेने शॉट मारला. हरमनप्रीतने पहिली धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेसाठी आग्रह केला आणि धावली. मात्र मिड ऑनवरुन हरलीन देओल हीने रॉकेट थ्रो केला. या थ्रो वर नॉन स्ट्राईक एंडवर हुमायरा काजी रनआऊट झाली. त्यामुळे हुमाअराला मैदानाबाहेर जावं लागलं.
हर्लीन देओल हीचा कडक थ्रो
BULLSEYE ?
A sensational direct-hit from @imharleenDeol ??
Follow the match ▶️ https://t.co/Hr0F1X3aj4#TATAWPL | #MIvGG pic.twitter.com/hkOMKGzo0T
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 14, 2023
हरलीनने केलेला हा थ्रो पाहून काही वेळ गुजरात जायंट्सच्या खेळाडूंनाही विश्वास बसला नाही. सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबईचा गुजरातवर दुसरा विजय
दरम्यान मुंबईचा हा या मोसमातील गुजरात विरुद्धचा दुसरा विजय ठरला आहे. दोन्ही संघ याआधी स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात 4 मार्च रोजी भिडले होते. या सामन्यात मुंबईने गुजरातचा 143 धावांनी पराभव केला होता. हा सामना जिंकून मुंबईने मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा रेकॉर्ड केला होता.
गुजरात जायंट्स प्लेइंग इलेव्हन | स्नेह राणा (कॅप्टन), सब्भिनेनी मेघना, सोफिया डंकले, हरलीन देओल, अॅशलेग गार्डनर, दयालन हेमलता, अॅनाबेल सदरलँड, सुषमा वर्मा (wk), किम गर्थ, तनुजा कंवर आणि मानसी जोशी.
मुंबई इंडियन्स | हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, धारा गुज्जर, अमेलिया केर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता आणि सायका इशाक.