MI vs GT : असं कसं? वाइड बॉलवर कोणी रिव्यू घेतं का? पण Harmanpreet Kaur ने घेतला रिव्यू

WPL 2023 : Harmanpreet Kaur ने वाइड बॉलवर रिव्यू घेऊन सगळ्यांनाच धक्का दिला. तुम्ही म्हणालं हे कसं शक्य आहे? टीमच्या विजयात कॅप्टन हरमनप्रीत कौरने महत्त्वाची भूमिका बजावली.

MI vs GT : असं कसं? वाइड बॉलवर कोणी रिव्यू घेतं का? पण Harmanpreet Kaur ने घेतला रिव्यू
Harmanpreet KaurImage Credit source: wpl twitter
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 9:40 AM

WPL 2023 : महिला प्रीमियर लीग 2023 ची सुरुवात झाली आहे. पहिल्या सीजनचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स या दोन टीम्स दरम्यान नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर झाला. मुंबई इंडियन्सने लीगमधील पहिल्या सामन्यात 143 धावांनी शानदार विजय मिळवला. टीमच्या विजयात कॅप्टन हरमनप्रीत कौरने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने फक्त तुफानी बॅटिंगच केली नाही, तर मैदानात असा एक निर्णय घेतला, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. महिला प्रीमियर लीगच नाही, आयपीएलमध्येही असं कधी पहायला मिळालेलं नाही.

महिला प्रीमियर लीगसाठी नियमांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. काही बदल DRS शी संबंधित आहेत. नव्या नियमांनुसार, आता फक्त LBW च नाही, तर नो बॉल, वाइड बॉलसाठी सुद्धा DRS घेता येईल. हरमनप्रीत कौरने या नवीन नियमाचा पुरेपूर फायदा घेतला.

वाइड बॉलसाठी घेतला रिव्यू

गुजरात जायंट्सची बॅटिंग सुरु असताना हा प्रसंग घडला. मुंबईने गुजरातसमोर 207 धावांच टार्गेट ठेवलं होतं. गुजरातच्या टीमचा या धावांचा पाठलाग करताना संघर्ष सुरु होता. 13 व्या ओव्हरआधी टीमचा स्कोर 8 बाद 49 धावा होता. त्यावेळी हरमनने मानसी जोशीकडे चेंडू सोपवला.

मानसीने चौथ्या चेंडूवर साइका इशाकाला LBW आऊट केलं. मानसीने ओव्हरमधील शेवटचा चेंडू टाकला, त्यावेळी मोनिका पटेल स्ट्राइकवर होती. तिने लेग साइडला चालेल्या चेंडूवर पुल करण्याचा प्रयत्न केला. पण तिला पुल मारता आला नाही. अंपायरने हा चेंडू वाइड घोषित केला. पण हरमनला अंपायरचा निर्णय पटला नाही. तिने रिव्यू घेण्याचा निर्णय घेतला.

नियम काय आहे?

हरमनप्रीत कौरने रिव्यूचा इशारा करताना अंपायरसह स्टेडियममधील सर्वच फॅन्स हैराण झाले. हरमन स्वत: हसत होती. रिप्लेमध्ये चेंडू ग्लोव्हजला स्पर्श करुन गेल्याचं दिसलं. हा चेंडू वाइड नव्हता. रिप्ले पाहिल्यानंतर अंपायरला निर्णय बदलावा लागला. हरमनला त्यानंतर आपलं हसू आवरता आलं नाही. सहकारी खेळाडूंनी तिचं कौतुक केलं. WPL मध्ये टीम्सन वाइड बॉल आणि नो बॉलवर रिव्यू घेण्याची परवानगी आहे. प्रत्येक टीमकडे एका डावात दोन रिव्यू उपलब्ध असतील. आऊट, नॉट आऊटशिवाय नो बॉल, वाइड बॉलसाठी सुद्धा रिव्यूचा उपयोग करता येईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.