WPL 2023 : 10 वी फेल, कमाई 10 लाख, धारावीच्या झोपडपट्टीत राहणारी मुलगी WPL मध्ये करणार कमाल
WPL 2023 : धारावी आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीसाठी ओळखलं जातं. याच धारावीच्या झोपडपट्टीतून आलेल्या एका मुलीने वूमेन्स क्रिकेटमध्ये एक मोठी झेप घेतली आहे. कोण आहे ती? जाणून घ्या.
WPL 2023 : WPL 2023 पहिल्या सीजनची दमदार सुरुवात झाली आहे. सीजनच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजराज जायंट्सवर 143 धावांनी विजय मिळवला. मुंबईच्या विजयात कॅप्टन हरमनप्रीत कौरने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने तुफानी बॅटिंग केली. 30 चेंडूत 65 धावा फटकावल्या. आता WPL मध्ये रविवारी अशीच एक क्रिकेटर मैदानात उतरणार आहे, जिची बॅटिंग आणि बॉलिंग पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. या महिला क्रिकेटरच नाव आहे, सिमरन शेख. ती यूपी वॉरियर्सच्या टीमचा भाग आहे. यूपीची टीम रविवारी गुजराज जायंट्स विरुद्ध खेळणार आहे. सिमरनला यूपीच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.
क्रिकेटच्या मैदानात दबदबा
सिमरन शेख आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीमध्ये राहते. सिमरन एका गरीब कुटुंबातून येते. तिला 7 भावंड आहेत. वडिल वायरमनच काम करतात. सिमरन 10 वी फेल आहे. दहावीत नापास झाल्यानंतर तिने शिक्षण सोडून दिलं. पण सिमरन शेखने क्रिकेटच्या मैदानात आपला दबदबा निर्माण केला.
सिमरन शेख रायटी बॅट्समन आणि जबरदस्त लेग स्पिनर आहे. सिमरन मीडल ऑर्डरमध्ये खेळते. आक्रमक बॅटिंग, हिटिंगसाठी सिमरन ओळखली जाते. WPL पहिलं पाऊल
सिमरन शेखला यूपी वॉरियर्सने 10 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. सिमरन शेखला भले बेस प्राइसला विकत घेतलं असेल, पण या खेळाडूसाठी पैशांपेक्षा WPL मध्ये खेळणं जास्त महत्त्वाच आहे. सिमरन शेख मागच्यावर्षी Senior Women’s T20 Challenger Trophy मध्ये खेळली होती. 21 वर्षाच्या सिमरनच टीम इंडियासाठी वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न आहे. WPL हे तिच्यासाठी स्वप्नाच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे.